शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

कालिदास महोत्सवाचा दुसरा टप्पा शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:45 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून कालिदास समारोह आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी हा समारोह २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांचे संयुक्त आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून कालिदास समारोह आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी हा समारोह २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात नागपूर येथे महाकवी कालिदास यांच्या ‘ऋतुसंहार’ या रचनेवर आधारित सहा ऋतूंच्या सौंदर्यावर पार पडला. दुसरा टप्पा रामटेक येथे होत आहे. २०१८ मध्येही हा समारोप दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय समितीने घेतला. त्या अनुषंगाने पहिला टप्पा ‘अभिज्ञान शाकुंतल-व्हाईस ऑफ इंडियन वूमन’ या विषयावर आधारित होता. दुसरा टप्पा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आदिवासी विकास विभाग, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर होत आहे. रसिक प्रेक्षकांनी या समारोहाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कालिदास समारोह आयोजन समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.पहिल्या दिवशी किशोर नृत्य निकेतन प्रस्तुत सरस्वती वंदना, अबिर गुलाल, सिद्धी धमाल, मांद्री, बधाई, सुफी गायन राहणार असून, दुसऱ्या दिवशी आदिवासी लिंगो नृत्य, सिद्धी धमाल, गेडी, नौहर्ता, किशोर नृत्य अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कालिदास समारोहाचे देशाच्या सांंस्कृतिक पटलावर स्थान टिकवून ठेवण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्तांनी २०१५ मध्ये कालिदास समारोह आयोजन समिती स्थापन केली. ही समिती आणि विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परंपरेचा पुन्हा आविष्कार’ हे ब्रीद घेऊन कालिदास समारोह रंगणार आहे. २०१६ मध्ये कालिदास यांची कृती ‘कुमारसंभवम’ वर आधारित ‘गुरु देवो महेश्वरा’ हे ब्रीद वाक्य घेऊन हा समारोह आयोजित करण्यात आला. २०१७ पासून कालिदास समारोह दोन टप्प्यात घेण्यात येत आहे.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर