नागपूर : भारत व म्यानमारच्या सीमेवर बुधवारी सायंकाळी ७.२५ वाजता भूकंपाचे झटके बसले. त्याची तीव्रता उपराजधानीतही अनुभवास आली. जिल्ह्यात कुठलेही नुकसान झाले नसले तरी, मिळालेल्या माहितीनुसार महाल परिसरातील एका बहुमजली इमारतीतील रहिवाशांनी इमारतीमध्ये कंपन अनुभवले. गिट्टीखदान भागातील बोरगाव परिसरातील रहिवाशांनाही असाच काहिसा अनुभव आल्याची माहिती आहे. यासंदर्भात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील भूकंप शाखेचे निदेशक दिनेश गणवीर यांनी सांगितले की, भारत-म्यानमार सीमेवर ६.८ रिश्टर स्केल एवढी नोंद करण्यात आली आहे. हा भूकंप जमिनीपासून १३४ कि.मी. आत आला आहे. हा परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील झोनमध्ये येतो. नागपुरातही भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती आहे.
नागपूरकरांनी अनुभवले भूकंपाचे धक्के
By admin | Updated: April 14, 2016 03:10 IST