शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात भाजपा नगरसेवकांची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:02 IST

निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देसहा विधानसभा क्षेत्रात आज बैठका : पक्षाच्या बैठकींना अनुपस्थित राहणाऱ्यांना जाब विचारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची झाडाझडती घेतली घेणार आहे. मंगळवारी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय भाजपाचे शहर अध्यक्ष, आमदार यांच्या उपस्थितीत पक्षाचे नगरसेवक, संघटन मंत्री व मंडळ अध्यक्षांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.महापालिका निवडणुकीत मतदारांनी विश्वास दर्शविल्याने भाजपाचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले. एकहाती सत्ता दिली तर प्रभागातील विकास कामांना गती मिळेल, अशी मतदारांना आशा होती. मात्र निवडणुका संपल्यापासून बहुसंख्य नगरसेवकांनी प्रभागातील सर्व वस्त्यांत फेरफटकाही मारलेला नाही. निवडणूक प्रचारात एकत्र फिरून विकासाची ग्वाही देणारे आता आपसात कुरघोडी करीत असल्याचे चित्र आहे. वर्ष झाले तरी भाजपाचे अनेक नगरसेवक सभागृहात मौन बाळगून असतात. यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर टीका होत आहे.सत्तापक्ष कार्यालयातील हजेरी पुस्तकात पक्षाचे नगरसेवक हजेरी लावत होते; परंतु वर्षभरात ही प्रथा जवळजवळ बंद आहे. काही मोजकेच नगरसेवक कार्यालयात येतात. सभागृहात नगरसेवकांनी प्रभागातील वा शहर विकासाच्या दृष्टीने विषय मांडणे अपेक्षित आहे. परंतु काही पाच-सात नगरसेवक सोडले तर भाजपाचे नगरसेवक सभागृहात गप्पच असतात. दुसरीकडे पक्षसंघटनेही बहुसंख्य नगरसेवक ांचे योगदान नाही. पक्षाच्या बैठकांनाही उपस्थित नसतात. प्रभागातील विकास कामे करताना नगरसेवक संघटन मंत्री, महामंंत्री यांना विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात नगरसेवकांना जाब विचारला जाणार आहे. याला पक्षाच्या नेत्यांनी दुजोरा दिला आहे.‘केआरए’ तपासणारगेल्या वर्षभरात नगरसेवकांनी प्रभागात केलेली विकास कामे, पक्षसंघटनेतील योगदान, महापालिकेच्या सभागृहातील योगदान, शासनाच्या तसेच महापालिकेच्या विविध योजना राबविण्यासाठी केलेले प्रयत्न, जनमानसात पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न याचा आढावा घेतला जाणार आहे. म्हणजेच बैठकीत नगरसेवकांचा केआरए तपासला जाणार आहे. महापालिकेतील ज्येष्ठनगरसेवकांनीही नवीन नगरसेवकांना शिस्त नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :BJPभाजपाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका