शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ऐतिहासिक वारसाच्या शोधात तरुणाई नागपुरातील महाल येथे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:09 IST

शहराचे जुने वैभव टिकावे, तरुणाईला त्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘द गुडविल ट्राईब’ व विदर्भ हेरिटेज सोसायटी यांच्या माध्यमातून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ७५ तरुण-तरुणींनी यात सहभागी होऊन महाल परिसरातील लुप्त होत असलेल्या हेरिटेज वास्तूंचे अवलोकन केले.

ठळक मुद्दे७५ तरुण-तरुणींचा हेरिटेज वॉक : दुरवस्थेत पडलेल्या वास्तूंचे केले अवलोकन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा ऐतिहासिक वारसा प्रशासनाच्या नजरेतून धूसर होत असल्याने, त्या वास्तू ओस पडलेल्या आहेत. महाल परिसरात अशा अनेक वास्तूंची दुरवस्था बघायला मिळते. समाज आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच पुरातन वास्तूकलेचा नमुना असलेल्या या हेरिटेज वास्तू नष्ट होऊन टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. शहराचे हे जुने वैभव टिकावे, तरुणाईला त्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘द गुडविल ट्राईब’ व विदर्भ हेरिटेज सोसायटी यांच्या माध्यमातून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ७५ तरुण-तरुणींनी यात सहभागी होऊन महाल परिसरातील लुप्त होत असलेल्या हेरिटेज वास्तूंचे अवलोकन केले.आजच्या तरुणाईला इतिहासाचे किती आकर्षण आहे, हे बघण्यासाठी ‘द गुडविल ट्राईब’ या संस्थेने हेरिटेज वॉकसाठी इंटरनेटवरून आवाहन केले होते. त्यासाठी आॅनलाईन फॉर्मवरून या उपक्रमाकरिता नोंदणी घेण्यात आली. याला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. त्यातून ७५ लोकांची निवड करण्यात आली. ही सगळी मंडळी रविवारी आपली सगळी कामे बाजूला सारून एका वेगळ्याच ऐतिहासिक सहलीला निघालेत. हेरिटेज वॉकची सुरुवात टिळक पुतळ्यापासून झाली. पुढे गांधी गेट, रुक्मिणी टेम्पल कॉम्प्लेक्स, देशमुख वाडा, सिनिअर भोसले वाडा, बाकाबाईचा वाडा, गोंडवाना गेट, कोतवाली, ओल्ड लायब्ररी बिल्डिंग आणि सगळ्यात शेवटी चिटणवीस वाडा या हेरिटेज साईटला त्यांनी भेटी दिल्या. या मोडकळीस आलेल्या वास्तूंच्या अवस्थेचे त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले. सहलीचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित केला असला तरी, शहराच्या ऐतिहासिक वारसा खऱ्या अर्थाने तरुणाईला दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे या माध्यमातून या ऐतिहासिक वारसा याचे जतन व्हावे, त्यामागचा प्रयत्न होता. नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा या वॉकच्या माध्यमातून अनेकांना माहीत पडला. त्यांच्या ज्ञानात भर पडली. किमान प्रशासनाचे लक्ष वेधले जाईलजर अशा वॉक नियमित आयोजित करण्यात आल्या, तर बऱ्याच हेरिटेज साईट्सकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल. या वास्तूंच्या सौंदर्यीकरणाचे तसेच देखभालीचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.मंदार पांढरे, समन्वयक, ‘द गुडविल ट्राईब’

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक