शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फरार डांगरेची शोधाशोध संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:41 IST

पोलिसांची तीन पथके कथितरीत्या शोध घेत असेल तर अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे पोलिसांना सापडत का नाही, असा संतप्त सवाल डांगरे पीडितांनी केला आहे.

ठळक मुद्दे तिन्ही पथके सक्रिय असून का सापडत नाही ? : पीडितांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांची तीन पथके कथितरीत्या शोध घेत असेल तर अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे पोलिसांना सापडत का नाही, असा संतप्त सवाल डांगरे पीडितांनी केला आहे. डांगरेच्या कथित शोधमोहिमेवरही संशय घेतला जात आहे. दरम्यान, डांगरेने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावपळ चालवली आहे.डांगरेविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन आठवडे झाले आहे. तेव्हापासून तो फरार आहे. त्याला शोधण्यासाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे एक तसेच गुन्हे शाखेची दोन पथके कामी लागल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र तीन पोलीस पथके शोध घेऊनही डांगरेचा पत्ता लागत नसल्यामुळे हे पोलीस शोधमोहिम राबवत आहेत की नुसता दिखावा करत आहेत अशी शंका घेतली जात आहे.विशेष म्हणजे, परिमंडळ चारचे प्रभारी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी डांगरेच्या जुन्या गुन्ह्याचा अहवाल बाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतर सक्करदरा तसेच हुडकेश्वर पोलिसांनी जुन्या फाईल शोधल्या. डांगरेने न्यायालयाचा अवमान केलेला आहे. मात्र, डांगरेला शोधण्याची तसदी पोलिसांनी घेतलेली नाही. डांगरे आतापर्यंत पोलिसांच्या सहकार्यामुळेच नागरिकांची फसवणूक करीत होता आणि त्यांना धमक्या देत होता. पीडित मंडळीकडून डांगरे विरुद्ध अनेकदा पोलिसांकडे दाद मागण्यात आली. मात्र पोलिसांनी आतापर्यंत थंड भूमिका बजावल्यामुळेच डांगरेने अनेकांची आयुष्याची पुंजी हडपली आहे. आताही पोलिसांकडून त्याला पकडण्यासाठी फारशी धावपळ केली जात नसल्याचा पीडितांचा आरोप आहे. पोलिसांची तीन पथके १५ दिवसापासून शोधमोहिम राबवत आहे तर त्यांना डांगरे सापडत कसा नाही असा संतप्त सवाल पीडित मंडळी करीत आहेत.मित्रांकडून मदतसूत्रांच्या माहितीनुसार पोलीस दलात डांगरेचे काही 'पोलीस मित्र' आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहमीच ते त्याला मदत करतात. याहीवेळी तेच त्याला मदत करून वाचवत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी