शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

कोरोनाबाधित नसलेल्या गाव-शहरांना सील करा : नितीन खारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:59 IST

प्रसार देशभर होऊ नये म्हणून कोरोनाने बाधित नसलेली गाव-शहरे त्वरित सील करावी, अशी सूचना कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधानांना ट्विटरवरील व्हिडिओतून केली सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित गाव-शहरांसाठी सरकार उपाययोजना करीतच आहे. परंतु प्रसार देशभर होऊ नये म्हणून कोरोनाने बाधित नसलेली गाव-शहरे त्वरित सील करावी, अशी सूचना कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरद्वारे केली आहे.आपल्या व्हिडिओ संदेशात खारा यांनी आजमितीस देशात १७० च्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे नमूद केले आहे. हे रुग्ण २० ते २५ शहरातील असल्याचे सांगून, कोरोनाबाधित नसलेल्या गावांपर्यंत ही साथ पसरू नये म्हणून ही सर्व गावे-शहरे सील करण्याची सूचना केली आहे.यासाठी स्वयंसेवी व समाजसेवी संस्थांमधील स्वयंसेवकांच्या चमू तयार कराव्यात. या चमू २४ तास शहरात येणारे ग्रामीण रस्ते, हायवेज, राज्य व राष्ट्रीय महामार्ग, बसस्थानक, रेल्वेस्थानक इत्यादींवर डॉक्टरांच्या चमूसह हजर राहतील व शहरात येणाऱ्यांची कोरोनासाठी तपासणी करतील. शहरातील मळ रहिवासींना शहरात जाण्याची परवानगी असेल, बाहेरगावच्या व्यक्तींना एकतर विलगीकरण कक्षात ठेवले जाईल किंवा परत पाठविले जाईल. कोरोनाबाधित टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीला उपचारासाठी पाठविण्यात यावे, असेही त्यांनी सुचविले आहे.अशा पद्धतीने शहरे सील केली तर शाळा, कॉलेज, व्यापार, दुकाने बंद करण्याची आवश्यक्ता राहणार नाही. रोजंदारी कमावणाऱ्या लोकांची रोजीरोटी सुरू राहील आणि बाहेरून येणाऱ्या सर्वांचीच तपासणी झालेली असल्याने कोरोनाबद्दलची भीती राहणार नाही. याच पद्धतीने गाव-खेडी, तालुुका मुख्यालये, जिल्हा मुख्यालयेसुद्धा सील करून कोरोनाचा प्रसार मर्यादित करता येईल. या व्हिडिओ संदेशात खारा यांनी पंतप्रधान व सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे.

हे तर अनुशासनपर्व - विजय दर्डायाप्रसंगी लोकमतचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डासुद्धा उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपुरातील पानठेले, चहाची दुकाने, बीअर शॉपी आणि लिकर बार ३१ मार्चपर्यंत बंद केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे नागरिकांना खर्रा, तंबाखुयुक्त पान, सिगारेट, बिडी, बीअर अथवा मद्य मिळणार नसल्याने त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खरेतर या कालावधीला अनुशासनपर्व समजून जनतेने आपली व्यसने सोडावीत व स्वच्छ शहरे व निर्व्यसनी समाज निर्माण करण्यासाठी या संधीचा उपयोग करावा, असे आवाहनही दर्डा यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटर