शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील भालदारपुरा परिसर सील : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 22:50 IST

नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग-महाल झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १९ मधील भालदारपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग-महाल झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १९ मधील भालदारपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिले आहेत.महापालिका हद्दीतील गांधीबाग-महाल झोनअंतर्गत प्रभाग १९ भागातील निश्चित केलेल्या कंटेनमेन्ट एरियानुसार चिटणीस पार्क , अग्रसेन चौक, तारेकर भवन पोस्ट ऑफीस, टाटा पारसी स्कूल आदी क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे.या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.शहरातील सतरंजीपुरा, शांतिनगर, मोमिनपुरा, गिट्टीखदान, गौतमनगर आधीच हॉटस्पॉट ठरल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता यात भालदारपुऱ्याची भर पडली आहे.प्रतिबंधित म्हणून घोषित क्षेत्र

  • दक्षिण पूर्वेस ए- चिटणीस पार्क(घाटे रेस्टॉरन्ट)
  • उत्तर पूर्वेस बी- अग्रसेन चौक
  • उत्तर पश्चिमेस सी- तारेकर भवन पोस्ट ऑफिस
  • दक्षिण पश्चिमेस डी- टाटा पारसी स्कूल
टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे