शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या पॉश हनुमाननगरात स्क्रब टायफसचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:41 IST

स्क्रब टायफसच्या आवळत्या विळख्याने लोक दहशतीत आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण व शहरातील जुनाट वस्तीमध्ये आढळून येणारा हा आजार हनुमाननगरसारख्या पॉश वसाहतीमध्येही दिसून येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय, गुरुवारी पुन्हा चार रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या १०६ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या १०६ वर : चार नव्या रुग्णांची पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्क्रब टायफसच्या आवळत्या विळख्याने लोक दहशतीत आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण व शहरातील जुनाट वस्तीमध्ये आढळून येणारा हा आजार हनुमाननगरसारख्या पॉश वसाहतीमध्येही दिसून येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय, गुरुवारी पुन्हा चार रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या १०६ वर पोहचली आहे.स्क्रब टायफस आजारावर सध्यातरी प्रतिबंधक लस नाही. यामुळे आजार टाळण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे महत्त्वाचे झाले आहे. या आजाराला कारणीभूत ठरलेला ‘चिगर माईट्स’ जीवाणूचा प्रादुर्भाव हा उंच गवतावर, दाट झाडीझुडूपात होतो. यामुळे तिथे जाणे टाळावे. उघड्यावर शौचास जाऊ नये, चारा, गवत गोळा करताना पूर्ण कपडे घालावे, झाडाझुडपात काम करून आल्यावर आपले कपडे गरम पाण्यात भिजवावे, लवकर निदान, लोकांची जनजागृती, उंदरांवर नियंत्रण मिळवले तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो, अशी जनजागृती पत्रके आरोग्य विभागाकडून वितरित केली जात आहे. परंतु त्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी नागपूर शहरातील हनुमाननगर येथील ३६ वर्षीय तर कामठी येथील ६० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. सूत्रानुसार, या दोन्ही महिलेवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. तर गुरुवारी नागपूर ग्रामीणमधील काटोल व नरखेडसह अमरावती व अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी एक-एक रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या रुग्णांची संख्या १०६ तर बळींची संख्या १६ झाली आहे.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य