शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रब टायफसने वृद्धाचा मृत्यू : बळी संख्या १५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 20:56 IST

‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असला तरी तातडीने निदान व औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याने रुग्णासोबतच मृत्यूचाही आकडा वाढत चालला आहे. शुक्रवारी पुन्हा एका मृत्यूची नोंद झाल्याने ही संख्या १५वर गेली आहे. तर रुग्णांची संख्या ८८वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे नव्या १० रुग्णांची भर : रुग्णांची संख्या ८८

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असला तरी तातडीने निदान व औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याने रुग्णासोबतच मृत्यूचाही आकडा वाढत चालला आहे. शुक्रवारी पुन्हा एका मृत्यूची नोंद झाल्याने ही संख्या १५वर गेली आहे. तर रुग्णांची संख्या ८८वर पोहचली आहे.मधुकर माहेपाल पुडके (७६) रा. केडीके कॉलेज परिसर, नंदनवन नागपूर असे मृताचे नाव आहे.स्क्रब टायफसचे सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. या रुग्णांची संख्या २९ एवढी असून यातील २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. तर शहरात १३ रुग्णांची नोंद झाली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी या रोगाचा मृत्यू म्हणून नोंद झालेले मधुकर पुडके ४ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल झाले. परंतु एक दिवसाच्या उपचारानंतर ५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.६३ रुग्ण भरती, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवरआतापर्यंत आढळून आलल्या स्क्रब टायफसच्या ८८ रुग्णांमधून १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६३ रुग्ण अद्यापही मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित १५ रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे. यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तर १० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

१५ ते ४५ वयोगटातील सर्वाधिक रुग्णस्क्रब टायफसचे आतापर्यंत आढळून आलेल्या ८८ रुग्णांमध्ये १५ ते ४५ वयोगटातील सर्वाधिक रुग्ण आहेत. या रुग्णांची संख्या ४७ एवढी आहे. उपलब्ध माहितीनुसार १ ते १४ वयोगटात ५ रुग्ण, १५ ते ३० वयोगटात २३ रुग्ण, ३१ ते ४५ वयोगटात २४ रुग्ण, ४६ ते ६० वयोगटात २६ रुग्ण, ६० वर्षांवरील वयोगटात १० रुग्णांचा समावेश आहे. यात ४४ महिला व ४४ पुरुष आहेत.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयDeathमृत्यू