शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

राज्यातील हजारो वाहनांवर स्क्रॅपचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:12 AM

एकट्या नागपुरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून अशी विना नोंदणीची तीन हजारावर वाहने आहेत. राज्यात याची संख्या हजारोंच्या घरात आहे. यामुळे हजारो वाहनांवर ‘स्क्रॅप’चे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्दे‘बीएस-४’ वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच विक्री होऊन नोंदणी न झालेली नागपुरात तीन हजारावर वाहने

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘बीएस-४’ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंत करण्याचे बंधन आहे. त्यानंतर विना नोंदणी आढळणाऱ्या वाहनांना भंगारात (स्क्रॅप) काढण्याचे निर्देश आहेत. परंतु ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ लागल्यानंतरच वाहनाची नोंदणी होते. एकट्या नागपुरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून अशी विना नोंदणीची तीन हजारावर वाहने आहेत. राज्यात याची संख्या हजारोंच्या घरात आहे. यामुळे हजारो वाहनांवर ‘स्क्रॅप’चे संकट उभे ठाकले आहे.वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत कार्बन उत्सर्जनाबाबतचे ‘बीएस-४’चे मापदंड पूर्ण करू न शकणाºया वाहनांवर सर्वोच्च न्यायालयाने देशव्यापी बंदी घातली आहे. या मानांकनातील वाहनांचे उत्पादन बंद झाले आहे. परंतु वाहन व्यवसायावर मंदीचे सावट असल्याने आजही अनेक विक्रेत्यांकडे ‘बीएस-४’ची वाहने पडून आहेत. या वाहनांवर १० हजारापर्यंतची सूट देण्याच्या जाहिरातीही झळकू लागल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आजही अनेक वाहन विक्रेत्यांनी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ ला गंभीरतेने घेतले नाही. यामुळे वाहनांना नंबर प्लेट लागण्यास उशीर होत आहे. नंबर प्लेट लागल्यावरच वाहनाची नोंदणी होते. याची दखल घेत आरटीओ कार्यालयांनी सर्व वाहन विक्रेत्यांना तातडीने नोंदणी करण्याचे पत्र दिले. सध्या नोंदणी न झालेली नागपूरसह राज्यात सुमारे २० हजारांवर वाहने असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

२३ दिवसांत हजारो वाहनांची नोंदणी कशी?३१ मार्च नोंदणीची शेवटची तारीख आहे. सुट्या वगळता नोंदणीसाठी २८ दिवसांचा कालावधी आहे. परंतु हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वाहनांना लागेपर्यंतच्या प्रक्रियेत पाच दिवसांचा वेळ जात असल्याने विक्रेत्यांकडे केवळ २३ दिवस आहेत.एवढ्या कमी दिवसात हजारो ‘बीएस-४’ वाहनांवर नोंदणी होणार कशी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

एचएसआरपी फोटो काढल्यावरच नोंदणीवाहन विक्रेत्याकडून विक्री झालेल्या वाहनाची मोटार वाहन निरीक्षक तपासणी करून संगणकावर नोंद करतो. विक्रेत्यांकडून ‘रोड टॅक्स’ भरला जातो. वाहनाच्या कागदावर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वाक्षरी करतो. लिपिक वाहनाला नंबर देतो. विक्रेता हा नंबर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) तयार करणाºया सेवापुरवठादाराकडे पाठवितो. प्लेट तयार होऊन आल्यावर वाहनाला लावली जाते. त्याचा फोटो काढून आरटीओच्या ‘वाहन’या संकेतस्थळावर टाकावा लागतो. त्यानंतरच नोंदणी होते. यात साधारण पाच दिवसांचा कालावधी जातो.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस