शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चोरी करणाऱ्या युवतीला चोप : घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:26 IST

दुकानाच्या काऊंटरवरील कपडे चोरणाऱ्या एका युवतीला दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी बेदम चोप दिला. चोरट्या युवतीचा चेहरा सार्वजनिक करण्याठी तिचे केस मागे खेचून तिला शिवीगाळ करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसर्वत्र खळबळ, पोलिसांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुकानाच्या काऊंटरवरील कपडे चोरणाऱ्या एका युवतीला दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी बेदम चोप दिला. चोरट्या युवतीचा चेहरा सार्वजनिक करण्याठी तिचे केस मागे खेचून तिला शिवीगाळ करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.जरीपटक्यातील चौधरी चौकाजवळच्या एका कपड्याच्या दुकानात ही युवती शिरली. तिने अनेक ग्राहकांच्या उपस्थितीत लॅगिन आणि अन्य काही कपडे आपल्या टी-शर्टमध्ये कोंबले. तिची नजर काही वेळाने दुकानात लागलेल्या सीसीटीव्हीवर जाताच तिने ते कपडे लगबगीने टी-शर्टमधून काढून दुकानाच्या काऊंटरवर ठेवले. दरम्यान, हा प्रकार दुकानदारासह एका महिला ग्राहकाच्या लक्षात आल्यानंतर दुकानदाराने तिला दुकानातून हाकलून लावले. काही वेळेनंतर ही तरुणी बाजूच्या दुसऱ्या एका कपड्याच्या दुकानात शिरली. तिच्या मागावर असलेला दुकानदार तिचा पाठलाग करीत त्या दुकानात पोहचला आणि त्याने त्या दुकानदाराला ही युवती चोरटी आहे, असे सांगितले. त्यानंतर दुकानदार आणि त्याच्या साथीदाराने युवतीला चोप देणे सुरू केले. तिने एकदा चोरी केल्याची कबुली देत मारू नका, मी कपडे आणून देते, अशी विनवणी केली. मात्र, दुकानदार आणि साथीदारांनी तिला बेदम मारहाण करतानाच तिचा व्हिडीओ तयार केला. व्हिडीओत तिचा चेहरा स्पष्ट दिसावा म्हणून आरोपी दुकानदारांनी तिचे केस मागे खेचले. त्यानंतर प्रकरण कसेबसे निस्तरले. दरम्यान, युवतीला चोप देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. त्यानंतर दोन्हीकडून पोलिसांत धाव घेण्यात आली. मात्र, प्रकरण दोघांच्याही अंगलट येण्याचे संकेत मिळाल्याने कुणीही तक्रार करण्याची हिंमत दाखवली नाही. परिणामी २४ तासांपेक्षा जास्त अवधी होऊनही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

 

 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्theftचोरी