लोकमत कॅम्पस क्लब व संडे सायन्स स्कूलचे आयोजननागपूर : लोकमत कॅम्पस क्लब व संडे सायन्स स्कूलतर्फे ५ ते १० व्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मॉडेल बनविण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या सिद्धांतावर आधारित मशीनचे मॉडेल बनविण्यास शिकविण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मशीनची कार्यप्रणाली समजणे सोपी जाईल व पुस्तकात दिलेल्या सूत्रांना आत्मसात करणेही सहज शक्य होईल, असा उद्देश या कार्यशाळेचा आहे. ही कार्यशाळा रविवारी १२ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वर्धा रोडवरील लोकमत भवनाच्या बी विंगच्या ११ व्या माळ्यावर आयोजित केली आहे. यात विद्यार्थ्यांना लेन्सद्वारे इमेज बनविणे, लेन्सला छोटे-मोठे करणे, फिल्म प्रोजेक्टरचे काम, अन्नातील प्रोटिन्सची तपासणी, न मिसळणारे द्रव्य, मेक इट राईट गेम, गतीचे घर्षण, दिशेला बदलणे, रोपवे मॉडेल अशा विज्ञानाच्या सिद्धांतानुसार आधारीत मॉडेलचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षणामध्ये होत असलेले परिवर्तन लक्षात घेता, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, मॉडेल बनवून विज्ञान समजावे, यामुळे विज्ञानाच्या नियमाचे विद्यार्थी व्यवहारिकदृष्ट्या उपयोग करू शकतील. याच उद्देशातून ही कार्यशाळा पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यात खेळातून विज्ञान कसे आत्मसात करता येईल, असेही मनोरंजनात्मक टास्क आहे. कार्यशाळेत बनविलेले प्रोजेक्ट, मॉडेल विद्यार्थी घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतील. यासाठी ७०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. यात मॉडेल बनविण्यासाठी आवश्यक किटच्या खर्चाचा समावेश आहे. नोंदणीसाठी लोकमत कॅम्पस क्लब कार्यालय, लोकमत भवन (२४२९३५५, ८०८७०१६८११,९८२२४०६५६२, ९९२२९६८५२६) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मॉडेल प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी
By admin | Updated: June 10, 2016 02:57 IST