शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान दिवस : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केले जैव प्लास्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:18 IST

मागील काही काळापासून जगभरात प्लास्टिकमुळे विविध समस्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. संशोधकांसाठी तर ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून कायमचे हद्दपार करणेदेखील शक्य नाही. मात्र जर ‘इकोफ्रेंडली’ प्लास्टिक मिळाले तर! नागपुरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या विचारांनीच झोप उडाली होती. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी प्रयोगावर प्रयोग करून पाहिले व अखेरीस त्यांच्या तोंडून शब्द निघाले ‘यूरेका’. पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर ठरू शकणारे जैव प्लास्टिक तयार केल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील काही तज्ज्ञदेखील त्यांच्या या संशोधनामुळे प्रभावित झाले आहेत.

ठळक मुद्देविघटन करणे शक्य : पर्यावरण संवर्धनासाठी ठरू शकते फायदेशीर

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही काळापासून जगभरात प्लास्टिकमुळे विविध समस्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. संशोधकांसाठी तर ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून कायमचे हद्दपार करणेदेखील शक्य नाही. मात्र जर ‘इकोफ्रेंडली’ प्लास्टिक मिळाले तर! नागपुरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या विचारांनीच झोप उडाली होती. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी प्रयोगावर प्रयोग करून पाहिले व अखेरीस त्यांच्या तोंडून शब्द निघाले ‘यूरेका’. पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर ठरू शकणारे जैव प्लास्टिक तयार केल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील काही तज्ज्ञदेखील त्यांच्या या संशोधनामुळे प्रभावित झाले आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील धम्मदीप वाघमारे व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील नितीन ढोरे यांनी ही कमाल केली आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे जगात सर्वात जास्त समस्या निर्माण होत आहे. हीच बाब लक्षात ठेवून या दोघांनीही विघटनशील प्लास्टिक कसे तयार होईल, यासंदर्भात विविध प्रयोग सुरू केले. धम्मदीपने तर बीएस्सीला असल्यापासूनच यासंदर्भात सखोल वाचन केले. ग्लिसरीन, स्टार्च पावडर व विनेगर या खाद्यपदार्थात वापर होणाऱ्या घटकांचा त्यांनी उपयोग केला. या मिश्रणाला त्यांनी अगोदर विशिष्ट तापमानावर गरम केले व त्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर त्यातून प्लास्टिकसारखा पदार्थ तयार झाला. सुरुवातीला हे प्लास्टिक लगेच तुटत होते. मग वेगवेगळे ‘कम्पोनन्ट्स’ वापरल्यानंतर जैव प्लास्टिक तयार झाले. हे प्लास्टिक जमिनीत टाकल्यानंतर दीड महिन्याच्या आत विघटित होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.या दोघांनीही त्यांचा हा प्रयोग रसायनशास्त्रातील विविध तज्ज्ञांना दाखविला. तसेच विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये ते सहभागी झाले. विद्यापीठ पातळीवर दोघांनाही पुरस्कार मिळाला व त्यांना राज्यपातळीवर प्रतिनिधित्व केले.आणखी सुधारणेची आवश्यकतानवोदय विद्यालयात बारावीला असल्यापासूनच आम्ही दोघांनी या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली होती. आम्ही सुरुवातीला अनेकदा अपयशाचा सामना केला. जैव प्लास्टिकचा दर्जा वाढावा यासाठी रबराच्या झाडासारख्या विविध घटकांचा उपयोग करून पाहिला. आम्ही जे जैव प्लास्टिक तयार केले आहे त्यातून प्लेट, कप, पिशवी बनू शकते. मात्र या गोष्टी जास्त वजन उचलू शकत नाही. जैव प्लास्टिकला मजबूत करण्यासाठी आम्ही नवीन प्रयोग करीत असल्याची माहिती धम्मदीप वाघमारेने दिली.

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थी