शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी विद्यार्थ्यांचा डोहात बुडून करूण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:17 IST

दोन शाळकरी विद्यार्थी पोहता पोहता डोहात शिरले आणि तिथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वग-वीरखंडीदरम्यान वाहणाऱ्या आमनदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वग येथे शोककळा पसरली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील वग शिवारातील घटना : पोहण्यासाठी उतरले नदीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन शाळकरी विद्यार्थी पोहता पोहता डोहात शिरले आणि तिथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वग-वीरखंडीदरम्यान वाहणाऱ्या आमनदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वग येथे शोककळा पसरली.सुजल रामकृष्ण डहाके (१४) व दिशांत किशोर शास्त्रकार (१४) दोघेही रा. वग, ता. कुही अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही वग येथील बालाजी पाटील हायस्कूलमध्ये इयत्ता आठव्या वर्गात शिकायचे, शिवाय ते मित्रही होते. मंगळवारी त्यांची सकाळची शाळा होती. त्यामुळे दोघेही त्यांच्या मित्रांसोबत दिवसभर खेळले आणि सायंकाळी सायकलने आम नदीवर पोहण्यासाठी गेले. विशेष म्हणजे, दोघांनाही पोहता येत होते. दरम्यान, ते डोहात शिरले आणि खोल पाण्यात जाताच गटांगळ्या खाऊ लागले. त्यातच दोघांचा बुडून मृत्यू झाला.त्यांनी त्यांची सायकल नदीच्या काठावर उभी ठेवली व सायकलवर कपडे ठेवले होते. त्याकडे शिवारातील शेतकºयाचे लक्ष गेले. त्याला शंका आल्याने त्याने मुलांचा शोध घेतला. ते कुठेही न गवसल्याने त्याने इतरांना बोलावून डोहात शोध घेतला असता त्यांना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सुजलचा मृतदेह गवसला. या प्रकाराची माहिती मिळताच दोघांचेही कुटुंबीय व ग्रामस्थ नदीजवळ पोहोचले. स्थानिक तरुणांनी लगेच डोहात उतरून दिशांतचा शोध घेतला असता, रात्री ७.३० वाजताच्या सुमारास त्याचाही मृतदेह गवसला. त्यानंतर कुही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरसुजल हा आईवडिलांना एकुलता एक होता. शिवाय, त्याचे वडील ‘टेलरिंग’चा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याला एक बहीण आहे. दिशांत हा मूळचा धुरखेडा (ता. उमरेड) येथील रहिवासी असून, त्याचे वडील फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय करून संसाराचा गाडा ओढतात. तो लहानपणापासून वग येथे मामाकडे राहायचा. तो पहिल्या वर्गापासून वग येथेच शिकला. त्याच्या मामाचे आठवडाभरापूर्वी आजाराने निधन झाले तर, महिनाभरापूर्वी आजोबांचा आजाराने मृत्यू झाला. त्यातच दिशांतही गेला. या घटनेमुळे डहाके व शास्त्रकार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू