शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू केली, सुविधा कोण देणार? मनपाला नाही गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:57 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बंद पडलेल्या शाळा सुरू तर केल्या, मात्र विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. बाबुळबनच्या मराठी प्राथमिक शाळेबाबतही हीच स्थिती दिसून येत आहे. ही बंद असलेली शाळा मनपाने सुरू केली व ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला. मात्र विद्यार्थ्यांना विदारक स्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. आठ दिवस लोटूनही सोईसुविधांबाबत प्रशासनाने गंभीरता दाखविली नसल्याने पालकांमध्ये रोष पसरला आहे.

ठळक मुद्देसंतप्त पालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बंद पडलेल्या शाळा सुरू तर केल्या, मात्र विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. बाबुळबनच्या मराठी प्राथमिक शाळेबाबतही हीच स्थिती दिसून येत आहे. ही बंद असलेली शाळा मनपाने सुरू केली व ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला. मात्र विद्यार्थ्यांना विदारक स्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. आठ दिवस लोटूनही सोईसुविधांबाबत प्रशासनाने गंभीरता दाखविली नसल्याने पालकांमध्ये रोष पसरला आहे. 

आपल्या मुलांना अतिशय वाईट अवस्थेत दिवस घालवावा लागत असल्याने, बहुतेक पालकांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी भेट घेउन संतप्त भावना व्यक्त केल्या. २६ जूनपासून सर्वत्र नियमित शाळा सुरू झाल्या आहेत. पटसंख्येची कारणे देत बाबुळबनची शाळा बंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी पालकांनी मुलांना या शाळेत प्रवेश देण्याची तयारी दाखविल्यानंतर ही शाळा सुरू करण्यात आली. त्यानुसार ३२ मुलांचे प्रवेश झाले आहेत. दोन शिक्षक या शाळेत सेवारत झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा तरी पुरवाव्या याची भ्रांत मनपा प्रशासनाला राहिली नाही.पालकांच्या तक्रारीनुसार शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, डेस्कबेंच नसल्याने मुलांना सतरंजीवरच बसावे लागते, शिक्षकांना बसण्यासाठीही येथे खुर्च्या-टेबल नाहीत. शाळेच्या भिंती जुनाट व भकास आहेत, त्यावर रंगरंगोटी करून शाळा बोलकी होईल व विद्यार्थ्यांना शिकण्यास आनंद मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची तसदी मनपाने घेतली नाही. साफसफाईसाठी सफाई कामगार नाही किंवा चपराशीही नाही. मुलांसाठी पाणी भरून ठेवावे म्हणून कुठलीही व्यवस्था नाही. मुलांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळाल्याची माहिती आहे, मात्र गणवेश अद्याप मिळाला नाही. त्यामुळे शाळेत मोटरपंप किंवा ओसीडब्ल्यूकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, शालेय साहित्य ठेवण्यासाठी लोखंडी कपाट उपलब्ध करावे, शाळेची घंटी, नोंदणी रजिस्टर, वह्या, पुस्तक पुरविणे, पटांगणात खेळणी बसविणे, शालेय पोषण आहाराची व्यवस्था करणे, महिला चपराशी व सफाई कामगाराची नियुक्ती करणे आदी मागण्यांचे निवेदन पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.निवेदनातील मागण्या बघता साध्या साध्या सुविधाही उपलब्ध करण्याची गरज मनपाला वाटली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय मनपाकडून सहज घेतला जातो. पण वाईट परिस्थिती असताना कोण पालक आपल्या मुलांना अशा शाळेत पाठवेल, याचा विचार मात्र केला जात नाही.शाळेसमोर चिखल, अतिक्रमणहीबाबुळबनच्या शाळेला दोन एकरच्या परिसरात प्रशस्त असे पटांगण आहे. आठ वर्गखोल्या असलेली प्रशस्त इमारतही आहे. मात्र त्याची दुरावस्था झाली आहे. पटांगणात धार्मिक स्थळांचे बांधकाम झाले असून काही भागात अतिक्रमणही झाले आहे. रात्री व दिवसाही असामाजिक तत्त्वांचा वावर येथे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी दिल्या. पावसाळ््याचे दिवस असल्याने शाळेच्या पटांगणात सर्वत्र चिखल साचलेला आहे आणि या चिखलातूनच मुलांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ही अवस्था होते, याची पूर्वकल्पना कुणालाही येईल. मनपाला मात्र याबाबत जाग आली नाही.दुर्बल समाज विकास संस्थेचे प्रयत्नमहापालिकेच्या मराठी शाळा टिकाव्या म्हणून अ. भा. दुर्बल समाज विकास संसाधन या संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या याचिकेवरच न्यायालयाने बंद शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन पालकांना मनपाच्या शाळेत मुलांना टाकण्यास प्रेरित केले व बाबुळबनच्या शाळेत ३२ प्रवेश मिळवून दिले. मात्र शाळा सुरू होऊच नये, अशा मानसिकतेत असलेल्या मनपा प्रशासनाकडून त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा