शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या  आरोपीला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:10 IST

सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या  एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निकाल : नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या  एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.मंगेश मधुकर दुरुगवार (२३), असे आरोपीचे नाव असून तो कळमेश्वर तालुक्यातील हरदोली येथील रहिवासी आहे.प्रकरण असे की, १० मे २०१४ रोजी रात्री ११ वाजताच्या पीडित मुलगी ही शौचास गेली होती. घराकडे परततेवेळी आरोपीने तिला गाठले होते. अतिप्रसंग करण्याच्या हेतूने तिला ओढत त्याने झुडपात नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पीडित मुलीने स्वत:ची अब्रू वाचविण्यासाठी जबरदस्त प्रतिकार केला होता. झटापटीत मुलगी जखमी झाली होती. त्याच्या तावडीतून तिने कशीबशी स्वत:ची सुटका करून स्वत:चे घर गाठल्यानंतर घडलेली घटना आपल्या घरच्यांना सांगितली होती. प्राप्त तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी भादंविच्या ३५४-ए, ५०६ आणि ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक करण्यात आली होती. हेड कॉन्स्टेबल तिल्लोत्तम देवगडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३५४-ए कलमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, ५०६ कलमांतर्गत एक वर्ष कारावास, २५० रुपये दंड आणि ३२३ कलमांतर्गत १ वर्ष कारावास, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील माधुरी मोटघरे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. मिराशे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर