शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शाळा बोलकी झाली अन् किलबिल वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:08 IST

ज्या शाळेत मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे.

ठळक मुद्देमनपाच्या सुरेंद्रगड शाळेला दिले नवे रूप कृतीतून शिक्षणाचा नवा पायंडा

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या आणि पडक्या इमारती, अस्वच्छता, निरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, असे निराशादायी चित्र महापालिकेच्या अनेक शाळांचे बघायला मिळते. शासनाने अध्यापनाच्या पद्धती बदलल्या पण महापालिकेच्या शाळांमध्ये आजही तोच तो पणा कायम दिसतो. पण ज्या शाळेत प्रमुख म्हणजेच मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो अशा निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे. इमारत जुनी असली तरी, तिला कल्पकतेने बोलकी केल्याने, शाळेत आता विद्यार्थ्यांची किलबिलही वाढली आहे.युनेस्कोनेही अशीच काहीशी संकल्पना मांडली आहे. त्यांच्या बिल्डींग अ‍ॅण्ड लर्निंग एड (बाला) या प्रकल्पाअंतर्गत भकास शाळांचे आंतरिक आणि बाह्य रूप सजवून त्यांना ‘चाईल्ड फ्रेंडली’ करण्याची ही संकल्पना आहे. याच संकल्पनेतून मुख्याध्यापिका शीला अथिलकर यांनी येथे काम सुरू केले. जनमंच या स्वयंसेवी संस्थेची त्यांना साथ मिळाली. मिळणाऱ्या वेतनातून त्यांनी शाळेच्या रंगरंगोटीवर खर्च केला आणि शाळेमध्ये काही बदल घडवून आणला. शाळेच्या आत प्रवेश केल्यास येथे भारताचा नकाशा काढलेला आहे. त्यात सर्व धर्म समभावाचा संदेश त्यातून दिला आहे. निसर्गाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळवे, झाडे वाचवा झाडे जगवा असा संदेश दिला आहे. निसर्गातील सौंदर्य कलेच्या माध्यमातून शाळेच्या भिंतीवर रेखाटले आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, व्यायामाचे काय फायदे आहे, स्वच्छतेमुळे आरोग्य कसे सदृढ राहील, वाहतुकीचे नियम पाळणे किती गरजेचे आहे, आवश्यक तेवढाच विजेचा वापर करावा, अशा आशयाचे सामाजिक संदेश कार्टुन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले आहे. कुंचल्याच्या माध्यमातून भिंतीवर रंगछटा साकारून वातावरण निर्मिती केली आहे.त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात झालेले कृतिशिल बदल हे वर्गामध्येही दिसून येत आहेत.त्यामुळे शाळेत नियमित होत असलेली स्वच्छता, निटनेटकेपणा यामुळे विद्यार्थी रमायला लागले आहेत. खासगी शाळांच्या धर्तीवर स्वच्छ पाणी, कम्प्युटर लॅब, सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधासुद्धा मनपाच्या शाळेत उपलब्ध करून दिल्या आहेत.

शाळेची प्रगती असो वा अधोगती ही शिक्षकांवरच अवलंबून असते. ज्या कर्तव्यासाठी सरकार आपल्याला वेतन देते ते कर्तव्य जर प्रामाणिक केले तर नक्कीच बदल घडून येतो. मी शाळेसाठी तेच केले आहे. थोडा आर्थिक भार मलाही पडला आहे. पण आज या शाळेची दखल घेतली जात असल्याचे समाधान आहे. कदाचित या बदलामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या ६०० पर्यंत गेली आहे.- शीला अथिलकर, मुख्याध्यापिका, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा, मनपा

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र