शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

पक्ष्यांचे घरटे बनवण्यासाठी सरसावली शाळकरी चिमुकली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:54 IST

अभिग्यान फाऊंडेशनचा सदस्य असलेल्या प्रणयने मुलांसाठी विविध उपक्रम राबविले आहे. मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याच्या हेतूने मुलांकडून घरातील टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून पक्षांसाठी घरटे बनविले आहेत. हे घरटे आता मुले घराच्या वरांड्यात अथवा घरी असलेल्या झाडावर ते टांगणार आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या फावल्या वेळेचा सदुपयोगयोगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार शिकण्यात घालवताहेत वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फावला वेळ मुलांसाठी अत्यंत कंटाळवाणा असतो. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना खेळायला मिळाले नाही तर त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असते. त्यामुळे, फावला वेळ हा सदुपयोगात घालवता आला नाही तर कठीण असते. ही स्थिती विचारात घेता ओमनगर येथील प्रणय भजभुजे या युवकाने मुलांसाठी वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे मुलांना गुंतवून ठेवण्याची शक्कल लढवली आणि त्यात तो यशस्वी झाला आहे.अभिग्यान फाऊंडेशनचा सदस्य असलेल्या प्रणयने मुलांसाठी विविध उपक्रम राबविले आहे. त्याच अभियानातून मुलांकडून वेगवेगळे आविष्कार घडविण्याची किमया त्याने साधली आहे. मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याच्या हेतूने मुलांकडून घरातील टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून पक्षांसाठी घरटे बनविले आहेत. हे घरटे आता मुले घराच्या वरांड्यात अथवा घरी असलेल्या झाडावर ते टांगणार आहेत. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट लढा देत असलेल्या डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, स्वच्छता दूत यांच्याविषयी मुलांमध्ये कृतज्ञता भाव निर्माण व्हावा म्हणून चित्रकला स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धा एकवेळ विषय देऊन मुलांकडून ते काढून घेणे सोपे असते. मात्र, घरटे बनविणे सोपे नव्हते. तेव्हा फिजिकल डिस्टेन्सिंगची काळजी घेत, सॅनिटायजरचा वेळोवेळी वापर करत आणि मास्क अत्यावश्यक ठरवून मुलांकडून ते स्वत: बनवून घेतले गेले आहेत. शिवाय मुलांना सकाळच्या समयी सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायामचे धडे देऊन त्यांच्या फिजिकल अक्टिव्हिटीलाही वाव देण्याचे प्रयत्न प्रणयने साधले आहे. या उपक्रमात रिनित नागपुरे, ओम हजारे, रियान चौधरी, यश हलबे, अर्श ठाकरे, लक्की नखाते, शिनू हलबे या चिमुकल्यांनी सहभाग घेतला आणि या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस