शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या हिंगण्यात शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:14 IST

शाळकरी मुलीला मोटरसायकलवर बसवून नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी तिचा विनयभंग केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ८ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर सदर मुलीचे पालक आणि आरोपीच्या पालकांमध्ये जोरदार वाद झाला.

ठळक मुद्देदोघांनी केले लज्जास्पद वर्तन : मोटरसायकवर बसवून स्मशानात नेले

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा/नागपूर : शाळकरी मुलीला मोटरसायकलवर बसवून नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी तिचा विनयभंग केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ८ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर सदर मुलीचे पालक आणि आरोपीच्या पालकांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.मुलगी १३ वर्षांची आहे. तिचे नात्यातीलच एकासोबत स्नेहसंबंध होते. नैसर्गिक विधीसाठी मुलगी रविवारी रात्री ११.३० ला एकटीच बाहेर गेली. परत येताना स्नेहसंबंध असणाऱ्या आरोपीने तिला मित्राच्या मोटरसायकलवर बसवले; सोबत त्याचा एक मित्र आणि नंतर पुन्हा दोन साथीदार होते. या चौघांनी तिला गावाबाहेरच्या स्मशानभूमीत नेले. तेथे दोघांनी तिच्यावर अत्याचार केला तर एकाने प्रयत्न केला. चौथ्याने लज्जास्पद वर्तन केले. हा प्रकार झाल्यानंतर मुलगी नातेवाईकांकडे निघून गेली. दरम्यान, मुलगी रात्रभर घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी तिची शोधाशोध केली. ती आरोपीशी संबंधित एका नातेवाईकाच्या घरी आढळल्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला खडसावून रात्रभर कुठे होती, अशी विचारणा केली. त्यानंतर उपरोक्त प्रकरणाची माहिती तिने पालकांना दिली. या प्रकरणात कधी तिघांनी तर कधी दोघांनी बलात्कार केल्याचे सांगितले जात होते.दरम्यान, मुलीकडून हा प्रकार ऐकल्यानंतर तिच्या पालकांनी आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांना जाब विचारला. त्यावरून मोठा वाद झाला. काही नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही पालकांनी आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे समेटाचे प्रयत्न फिस्कटले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी हिंगणा ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरण सामूहिक बलात्काराचे असल्याने हिंगणा पोलिसांनी अपहरण करून बलात्कार करणे, विनयभंग करणे, धमकी देणे आदी आरोपाखाली पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलमही लावले.दोन आरोपी अल्पवयीनया प्रकरणात चार आरोपी आहेत. त्यातील दोन अल्पवयीन असून, आरोपी अमित जयप्रकाश ठाकूर (वय १८) आणि बलवंत गोंड (वय २०) हे दोघे सज्ञान आहेत. त्यांनीच बलात्कार केल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमित ठाकूरला अटक केली तर, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. दोन फरार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारStudentविद्यार्थी