शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘फूटपाथ’वर भरणारी शाळा; ‘मॉडर्न’ युगाचे संवेदनशील शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 11:34 IST

वर्गखोल्यांमध्ये भरणाऱ्या शाळेचा अनुभव साचेबद्ध असतो. मात्र शिक्षणाचा गंधही नसलेल्या मुलांसोबत ‘फूटपाथ’वर शाळा चालविताना मिळणारा अनुभव हा कुठल्याही पुस्तकातील ज्ञानापेक्षा निश्चितच वेगळा ठरतो.

ठळक मुद्देवंचितांपर्यंत पोहोचवत आहेत ज्ञानगंगा

अंकिता देशकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्गखोल्यांमध्ये भरणाऱ्या शाळेचा अनुभव साचेबद्ध असतो. मात्र शिक्षणाचा गंधही नसलेल्या मुलांसोबत ‘फूटपाथ’वर शाळा चालविताना मिळणारा अनुभव हा कुठल्याही पुस्तकातील ज्ञानापेक्षा निश्चितच वेगळा ठरतो. विद्यापीठ ग्रंथालयाकडून महाराज बागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर सायंकाळी अशीच एक शाळा भरते. आपले दोन शिक्षक कधी येतात याची लहान मुले प्रतीक्षा करत असतात अन् शिक्षक दिसले की त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. विशेष म्हणजे हे शिक्षक म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य तरुणाईचे प्रतिनिधी असून ‘मॉडर्न’ युगातदेखील संवेदनशीलता जपल्याने ते या समाजकार्याकडे वळले.तसे पाहिले तर ‘उपाय’ (अंडर प्रिव्हिलेज्ड अ‍ॅडव्हान्समेन्ट बाय युथ) ही स्वयंसेवी संस्था नागपूरसाठी नवीन नाही. वरुण श्रीवास्तव यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे नागपुरात ११ केंद्र चालतात. वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिकविण्यात या संस्थेचा मौलिक वाटा आहे. महाराज बागजवळील ‘फूटपाथ’ शाळेत ‘लोकमत’ने भेट देऊन एक सायंकाळ घालविली असता एक वेगळाच अनुभव मिळाला. शिक्षक आल्यानंतर विद्यार्थी फूटपाथवर उभे राहून ‘नमस्ते’ म्हणतात. काही विद्यार्थी चक्क इंग्रजीत ‘गुड इव्हिनिंग’ने स्वागत करतात तर काही पाया पडून आशीर्वाद घेतात. किरण कलंत्री व दिव्या बेलेकर या दररोज येथे मुलांना शिकवायला येतात.किरण कलंत्री या स्वत: शिक्षिका आहेत. त्यामुळे शिकविण्याचे कौशल्य त्यांच्यात आहेत. मात्र या मुलांना शिकविताना मला दररोज नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. दिव्या बेलेकर ही विज्ञान पदवी अभ्यासक्रमाची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी काही दिवसांअगोदरच संस्थेशी जुळली आहेत. या मुलांशी फार कमी कालावधीत आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे, असे तिने सांगितले.

स्पर्धांचेदेखील आयोजनया अनोख्या शाळेत मुलांना अभ्यासासोबतच स्पर्धांच्या माध्यमातून विविध खेळांचेदेखील ज्ञान देण्यात येते. यात जम्पिंग रेस, कराटे यांचा समावेश आहे. या मुलांना शिक्षिकांनी पेपर बॅग्सदेखील बनविण्यास शिकविले आहे. तर मुलांनी त्याना पेपरपासून टोपी बनविणे शिकविले.

टॅग्स :Schoolशाळा