शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बस उभ्या करून आरटीओचे प्रवेशद्वार केले बंद; परवानाधारक बस असोसिएशनचे आंदोलन

By सुमेध वाघमार | Updated: June 23, 2025 18:35 IST

Nagpur : ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस’ची अट शिथिल करण्याची मागणी

नागपूर : बसच्या योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीएलटी) सक्रिय असण्याची अट जाचक असून, अनेक स्कूल बसला योग्यता प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे, ही अट शिथिल करण्याच्या मागणीसाठी महानगर परवानाधारक बस असोसिएशनच्या वतीने सोमवारी आरटीओ नागपूर ग्रामीणच्या प्रवेशद्वाराजवळ बस उभ्या करून आंदोलन केले. प्रवेशद्वार बंद झाल्याने काही वेळेसाठी कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले होते.

असोसिएशनचे शैलेश पांडे यांनी सांगितले, २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना २४ महिन्यांचे योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. आता हे प्रमाणपत्र वाहनात ‘व्हीएलटी’ सक्रिय असेल तरच देण्यात यावे, असे आदेश परिवहन विभागाने काढले आहेत. मात्र, ‘व्हीएलटी’ची वैधता सहा महिने, १२ महिने किंवा दोन वर्षेसुद्धा असू शकते. परंतु योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाची तारीख व ‘व्हीएलटी’ संपण्याची तारीख एकाचवेळी येईलच, असे नाही. त्यामुळे ही अट बसचालकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे परिवहन विभागाने ही अट मागे घ्यावी, अशी मागणी आहे.

यासंदर्भातील एक निवेदन १२ जून रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना देण्यात आले होते. त्यावेळी आरटीओच्या प्रवेशद्वारासमोर बस उभ्या करून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. परंतु १० दिवसांचा कालावधी होऊनही परिवहन विभागाने यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. जवळपास १०० बसेस प्रवेशद्वाराजवळ उभ्या करण्यात आल्या होत्या. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी मागणीला घेऊन सकारात्मकता दाखविल्याने तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात वीरेंद्र दुबे, धनराज बनसोड, ब्रिजेश मिश्रा, रफीकभाई, माधव खोपडे यांच्यासह मोठ्या संख्येत स्कूल बसचालक सहभागी झाले होते.

टॅग्स :nagpurनागपूर