शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील  भिवापूर पंचायत समितीत भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:07 IST

शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजली. मात्र तेव्हापासूनच नव्हे तर उन्हाळ्यात बंद झालेली शाळा आतापर्यंत उघडलीच नाही. हा प्रकार प्रकल्पग्रस्त गाव असलेल्या थुटाणबोरी येथील आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकांनी प्रशासनाला साकडे घातले. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. परिणामी संतापलेल्या प्रकल्पग्रस्त पालकांनी बुधवारी (दि. १८) भिवापूर पंचायत समिती गाठत चक्क कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरविली.

ठळक मुद्देथुटाणबोरीचे विद्यार्थी संतप्त : कुलूपबंद शाळा उघडण्यासाठी प्रशासनाला घातले साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजली. मात्र तेव्हापासूनच नव्हे तर उन्हाळ्यात बंद झालेली शाळा आतापर्यंत उघडलीच नाही. हा प्रकार प्रकल्पग्रस्त गाव असलेल्या थुटाणबोरी येथील आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकांनी प्रशासनाला साकडे घातले. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. परिणामी संतापलेल्या प्रकल्पग्रस्त पालकांनी बुधवारी (दि. १८) भिवापूर पंचायत समिती गाठत चक्क कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरविली.थुटाणबोरी हे गोसेखुर्द प्रकल्पातील बुडीत गाव आहे. या गावाचे पुनर्वसन कारगाव शिवारात प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु योग्य मोबदला मिळाला नसल्याने तसेच पुनर्वसन ठिकाणी असलेल्या समस्यांमुळे प्रकल्पग्रस्तांनी बुडीत गाव सोडण्यास नकार दिला आहे. बुडीत गावातील नागरिकांना गावाबाहेर काढण्यासाठी प्रशासनाने नानाविध क्लृप्त्य योजल्या. गावातील विद्युतपुरवठा खंडित करणे, रेशन पुरवठा थांबविणे यासोबतच इतरही सुविधा बंद केल्या. त्यामुळे काही प्रकल्पग्रस्त नागरिकांनी अखेर पुनर्वसनस्थळी मुक्काम हलविला. परंतु अनेक कुटुंब अद्यापही बुडीत गावातच आहे.यावर्षी तर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार न करता शाळाच बंद करण्याचा विचार केलेला दिसतो. शैक्षणिक सत्र सुरू होऊन २२ दिवस झाले असले तरी अद्याप थुटाणबोरीतील शाळा अद्याप उघडलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन दिले, साकडे घातले. त्यानंतरही काहीच परिणाम न झाल्याने अखेर बुधवारी शालेय विद्यार्थी, अंगणवाडीतील चिमुकल्यांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठले. त्या कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरली. त्यात पहिली ते चौथीचे पाच विद्यार्थी, पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणारे आठ, अंगणवाडीतील १६ चिमुकल्यासंह त्यांचे पालक उपस्थित होते. परंतु वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही स्पष्ट भूमिका घेत नसल्याने पंचायत समितीच्या शिक्षण विभागही चूप आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीत असून त्यानंतर चर्चा करतो, असे सांगितले.शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकारप्रकल्पग्रस्त असलो म्हणून काय झाले, आम्हीही माणसंच आहोत. मात्र प्रशासन आमच्याशी दुजाभाव करीत आहे. आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. प्रशासनाच्या या हेकेखोर धोरणामुळे वैनगंगेच्या खोऱ्यातील पिढी नेस्तनाबूत करण्याचेच काम केले जात आहे. मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे ‘पाप’ शासन आणि प्रशासन करीत आहे, हे खरेच दुर्दैवी आहे. डुबराज गुरुपुडे,उपसरपंच, थुटाणबोरी.बदली आॅनलाईन; शाळा आॅफलाईनपुनर्वसित आणि बुडीत थुटाणबोरी या दोन्ही गावातील शाळा गतवर्षी सुरू होत्या. यावर्षी झालेल्या ‘आॅनलाईन’ बदल्यांमुळे बुडीत गावातील शाळा मात्र ‘आॅफलाईन’ झाली आहे. थुटाणबोरी शाळेत दिलीप जिभकाटे आणि अविनाश हाके हे दोन शिक्षक कार्यरत होते. यातील जिभकाटे हे पुनर्वसित शाळा तर हाके बुडीत गावातील शाळा सांभाळायचे. यावर्षी झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये थुटाणबोरी येथे नारदेलवार आणि फुलझेले हे दोन शिक्षक रुजू झाले. मात्र यापैकी एकही शिक्षक बुडीत गावातील शाळेत गेले नाही. शिवाय लांब अंतर, जंगलातून प्रवास आणि उखडलेल्या रस्त्यामुळे तेथे शिक्षकसुद्धा जाण्यास तयार नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Schoolशाळाpanchayat samitiपंचायत समिती