शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधीत गोंधळ : हायकोर्टाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:06 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भविष्य निर्वाह निधीतील गोंधळाची गंभीर दखल घेऊन, या संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. अतुल पाठक यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्वत:च दाखल केली जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भविष्य निर्वाह निधीतील गोंधळाची गंभीर दखल घेऊन, या संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. अतुल पाठक यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.देशातील श्रमिकांच्या कल्याणाकरिता भविष्य निर्वाह निधी कायदा लागू करण्यात आला आहे. विविध १८१ रोजगारांमधील श्रमिक या कायद्यांतर्गत येतात. कायद्यातील तरतुदीनुसार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात दर महिन्याला श्रमिकाच्या नावाने आवश्यक योगदान जमा होते. भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर भविष्य निर्वाह निधी योजना, निवृत्ती वेतन योजना व विमा योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. परंतु, हे कार्यालय व केंद्र सरकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे श्रमिकांना आवश्यक लाभ मिळत नाहीत. श्रमिकांना अधिकारांची जाणीव नसल्यामुळे १२ एप्रिल २०१७ पर्यंत कुणीही दावा केला नाही असे ४० हजार ८६५ कोटी रुपये भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा होते. या रकमेत आता पुन्हा वाढ झाली आहे. ही रक्कम खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच, भविष्य निर्वाह निधीची देयके निश्चित करताना व नियोक्त्यांकडून दंड वसूल करताना कायद्याचे पालन होत नाही. त्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारने भविष्य निर्वाह निधीची देयके निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली पाहिजे व श्रमिकांमध्ये त्यांच्या अधिकारासंदर्भात जागृती आणली पाहिजे, असे अ‍ॅड. पाठक यांचे म्हणणे आहे.उत्तर दाखल करण्याचे निर्देशया प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय श्रमिक व रोजगार मंत्रालय आणि भविष्य निर्वाह निधी नागपूरचे सहायक आयुक्त यांना यावर आठ आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के हे न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयProvident Fundभविष्य निर्वाह निधी