शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सदर कार्यालयात २१०० कोटींचा घोटाळा! नागपूरच्या नोंदणी यंत्रणेत भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:45 IST

हिंगणा, सक्करदरा नंतर सदरचा नंबर : चार्टर्ड अकाउंटंट एजन्सी आणि अधिकाऱ्यांचा संशयास्पद रोल

नागपूर : इंटेलिजन्स अँड क्रीमिनल इन्व्हेस्टिगेशन (आय अॅड सीआय) विंगतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नागपूरच्या दुय्यम निबंधक (सदर) कार्यालयात तब्बल २,१०० कोटी रुपयांचा गोलमाल झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षात ३० लाख रुपयांवरील रजिस्ट्रीचा डेटा विभागाला न पाठविल्यामुळे हा प्रकार समोर आला असून, रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहार कमी दराने दाखवून महसुलाला मोठ्या प्रमाणावर गंडा घालण्यात आल्याचे आयकर विभागाच्या स्पष्ट झाले आहे.

हिंगणा आणि सक्करदरानंतर आता सदर कार्यालयआयकर विभागाने अलीकडेच हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील १,३०० कोटींचा, तर सक्करदरा येथील ५०० कोटींचा घोटाळा उघडकीस आणला होता. आता सदर कार्यालयातील २,१०० कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयांमधील बेकायदेशीर व्यवहारांचा मोठा पॅटर्न स्पष्ट होऊ लागला आहे.

डेटा 'गायब' करण्याचा प्रकारनियमांनुसार, ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता व्यवहारांची माहिती आयकर विभागाला नियमितपणे पाठविणे आवश्यक असते. मात्र, सदर कार्यालयाने गेल्या पाच वर्षांतील मोठ्या प्रमाणातील अशा रजिस्ट्री जाणीवपूर्वक किंवा दुर्लक्षामुळे विभागाकडे न पाठविता, कमी दराने रजिस्ट्री करून महसुलात फसवणूक केल्याचा संशय आहे.

पुढील कारवाईचे संकेतआयकर विभाग लवकरच यासंदर्भात सखोल चौकशी करणार असून, जबाबदार अधिकारी, रिअल इस्टेट व्यावसायिक आणि संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई होण्याची चिन्हे आहेत. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काळात नागपूर जिल्ह्यातील इतरही सहदुय्यम निबंधक कार्यालयांचे सर्वेक्षण होणार असून, आणखी घोटाळे दररोज समोर येण्याची शक्यता आहे. 

नागरिकांचा प्रश्नप्रत्येक वेळी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस येत असले तरी जबाबदार अधिकारी व संबंधितांवर ठोस कारवाई होत नाही, अशी नागरिकांची तीव्र नाराजी आहे. महसूल विभाग व राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

कोण जबाबदार?सदर कार्यालयात डेटा संकलनाचे काम करणारी एका चार्टर्ड अकाउंटंटची एजन्सी, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून या सर्व व्यवहारांना डोळेझाक केली गेल्याचे प्राथमिक निष्कर्षात दिसून आले आहे. काही प्रकरणांमध्ये 'रेडी रेकनर' दरापेक्षा खूपच कमी दराने मालमत्ता विक्री दाखवून लाखो रुपयांचा कर चुकवण्यात आला आहे. या घोटाळ्यात बिल्डर-डेव्हलपर्स, गुंतवणूकदार, तसेच काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर