शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील उत्थान पतसंस्थेचा घोटाळा उघड! ५ वर्षात ४.५४ कोटींचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 18:18 IST

२१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पिग्मी एजंट, वसुली अधिकाऱ्यांना दिल्या नियमबाह्य रकमा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या २१ पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थेची आणि ठेवीदारांची ४ कोटी ५४ लाख ६८ हजार २३७ रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली असून जरीपटका पोलिसांनी संस्थेच्या २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शशिकांत नारनवरे (व्यवस्थापक), महेंद्र जनार्दन राऊत (अध्यक्ष), संजय दशरथ गजघाटे (उपाध्यक्ष), रवींद्र धर्मदास मेश्राम (संचालक), दुर्योधन डहारे, भगवा विठुजी नन्नावरे, गौतम दौलत गेडाम, राजेश पुरुषोत्तम मांजरे, नरेंद्र नामदेव शेंडे, अचल मनुराज रामटेके, मिलिंद नामदेव लांजेवार, प्रमोद देवदास वासनिक, प्रवण रामचंद्र मेश्राम, संजय माणिक जयस्वाल, विरंशकुमार वरखेडे, मनोज भीमराव गजभिये, छाया मधुकर मेश्राम (संचालिका), संगीता संजय थुल, नंदिनी अजयकुमार गौतम, स्वीकृत को ऑप. संचालक नरेश सोमकुंवर आणि प्रदीप मेश्राम अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

२८ मे २०२५ रोजी नारायण भुपतराव गाधेकर (५७, रा. श्री दत्तप्रसाद बंग्लो, नाशिक, ह. मु, गणेशपेठ पोलिस ठाणे समोर) हे विशेष लेखा परीक्षक वर्ग-२ म्हणून सहकारी संस्था, नागपूर येथे कार्यरत आहेत. गाधेकर यांनी जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उत्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इंदोरा या सहकारी पतसंस्थेचे एप्रिल २०१८ ते मार्च २०२३ असे ५ वर्षाचे लेखा परीक्षण केले असता आरोपींनी संगनमताने कट रचून, ठेवीदाराच्या नियमबाह्य ठेवी स्वीकारून त्या ठेवी परत केल्या नाहीत. तसेच, खोट आर्थिक पत्रके तयार करून ते खरे असल्याचे भासवून शासनास सादर केले.

लेखा परीक्षणात झाले निष्पन्नशासनाची, जनतेची व ठेवीदारांची दिशाभूल करून आरोपींनी ठेवीदारांच्या पैशाचा दुरुपयोग केला. तसेच बेकायदेशीर खर्च करून पिग्मी एजंट यांना बेकायदेशीर कमिशन व वसुली अधिकाऱ्यांना नियमबाह्य रक्कमा दिल्याचे लेखा परीक्षणात आढळले. यात आरोपींनी पतसंस्था व ठेवीदारांची एकूण ४ कोटी ५४ लाख ६८ हजार २३७ रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गाधेकर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पतसंस्थेच्या २१ पदाधिका-यांविरुद्ध कलम ४०६, ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४७१, ८७७ (अ), १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर