लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये सुरू केलेल्या स्टॅण्ड अप इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेचा फायदा एससी व एसटी युवक आणि महिलांना मिळावा, असे आवाहन सिडबीचे उपमहाव्यवस्थापक पी. के. नाथ यांनी येथे केले.दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजच्या(डिक्की)वतीने आणि स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्टॅण्डअप इंडिया क्लिनिक’ या माहितीपर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. आयोजन बानाई हॉल, उर्वेला कॉलनी, वर्धा रोड येथे करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डिक्की पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष गोपाल वासनिक, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश दवंडे, उपाध्यक्ष चंदू पाटील, रूपराज गौरी, मुद्रा योजना समितीचे सदस्य व बँक आॅफ इंडियाचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक श्रीराम बांदे, डिक्की महाराष्ट्रचे वित्तीय प्रमुख विजय सोमकुवर, सिडबीच्या सहायक व्यवस्थापिका प्रियंका शेंडे, बँक आॅफ बडोदाचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अनिल मून, डिक्की विदर्भ चॅप्टर महिला विंगच्या अध्यक्ष विनी मेश्राम, उपाध्यक्ष क्रांती गेडाम, डिक्की कोर ग्रुप सदस्य प्रदीप मेश्राम, गौतम सोनटक्के, मंगेश डोंगरवार, राज मेंढे, समीर मेश्राम उपस्थित होते.नाथ म्हणाले, योजनेच्या अंमलबजावणीत येणाºया समस्या दूर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. कर्ज प्रदान करण्यासाठी येणाºया तांत्रिक समस्या दूर करण्यात येत आहेत.निश्चय शेळके म्हणाले, स्टॅण्ड अप इंडिया योजनेत देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकेच्या सर्व शाखांना एक एससी, एसटी आणि महिलेला उद्योग स्थापन करण्यासाठी विना को-लॅटरल १० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज देणे बंधनकारक आहे. कर्जदाराला स्टॅण्ड अप मित्र डॉट कॉमवर आॅनलाईन नोंदणी करता येईल. गोपाल वासनिक म्हणाले, एससी, एसटी युवकांना योजनेचा लाभ मिळावा, याकरिता डिक्कीतर्फे वेळोवेळी माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. संचालन क्रांती गेडाम यांनी तर आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त एससी, एसटी युवक-युवती आणि महिला हजर होत्या.
स्टॅण्ड अप इंडियाचा फायदा एससी व एसटी युवकांना मिळावा : पी.के. नाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:46 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये सुरू केलेल्या स्टॅण्ड अप इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेचा फायदा एससी व एसटी युवक आणि महिलांना मिळावा, असे आवाहन सिडबीचे उपमहाव्यवस्थापक पी. के. नाथ यांनी येथे केले.
स्टॅण्ड अप इंडियाचा फायदा एससी व एसटी युवकांना मिळावा : पी.के. नाथ
ठळक मुद्दे‘डिक्कीतर्फे स्टॅण्डअप क्लिनिक’ कार्यक्रम