शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

‘मोठा भाऊ’ सांगा, राम मंदिर कधी बनणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 10:37 IST

गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला.

ठळक मुद्देप्रवीण तोगडिया यांचा सवालपंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. सर्वच जण आपल्या ‘मन की बात’ करीत आहेत. रामजीच्या मनातील बात तर कुणी ऐका. भगवान राम यांना अयोध्येत राहण्यासाठी घर नाही. त्यांना घर कधी मिळेल, याचे उत्तर माझा ‘मोठा भाऊ ’अर्थात नरेंद्र मोदींनी द्यावे, असेही ते म्हणाले.रामनवमीच्या पर्वाचे निमित्त साधत धंतोली येथील विहिंप कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करताना डॉ. तोगडिया म्हणाले, राम मंदिराबाबत १९८४ पासून प्रकरण सुरू आहे.सद्यस्थितीत न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारले जाईल, असे सरकार सांगत आहे. असे आहे तर राम मंदिराच्या मुद्यावर आंदोलन का उभारण्यात आले. लाखो कार सेवक एकत्र आले, हजारोंना तुरुंगात जावे लागले. शेकडोंनी बलिदान दिले. मात्र, २०१४ मध्ये सत्ता सांभाळताच राम मंदिरला विसरले. गेल्या चार वर्षांपासून आपण या मुद्यावर सरकारला जाब विचारत आहोत. मात्र, काहीच उत्तर मिळत नाही. दहा दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. केंद्रात भाजपाचे सरकार बहुमतात आहे. कायदा तयार करून राम मंदिर उभारायला हवे. न्यायालयाचा निर्णय आला तर पुन्हा वाद तयार होतील. मंदिरासमोर मशीद उभारली जाईल. हिंदूंना हे कधीच मान्य राहणार नाही, असेही ते म्हणाले.तोगडिया म्हणाले. १९७२ पासून आपले मोदींशी व्यक्तिगत संबंध आहेत. आपले त्यांच्या घरी येणे जाणे राहिले आहे. मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेऊ शकतात, तर माझी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जीवाला धोका असल्याबाबतच्या प्रश्नावर तोगडिया म्हणाले, मला माझ्या जीवाची पर्वा नाही. पूर्वी जे बोलायचे होतो, ते बोललो. आता काहीच बोलायचे नाही.राम मंदिराबाबत संघाच्या भूमिकेबाबतच्या प्रश्नालाही बगल देत आपण स्वयंसेवक असून गेल्या ५० वर्षांपासून संघाशी संबध असल्याचे सांगत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. हार्दिक पटेल यांच्याशी झालेल्या भेटीबाबत विचारणा केली असता आपण कुणाशीही भेटू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता हिंदू आंदोलन करणार नाहीतोगडिया म्हणाले, राम मंदिराच्या मुद्यावर आता हिंदू आंदोलन करणार नाही. छातीवर गोळ्या झेलणार नाहीत. आता ही सरकारची जबाबदारी आहे. संसदेत कायदा तयार करावा व अयोध्येत राम मंदिर उभारावे. रामनवमीच्या पर्वावर नागपुरात शोभायात्रेचे उद्घाटनप्रसंगी आपण हीच प्रार्थना देवाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार, शिक्षण, कर्जमाफीत सरकार अपयशीकेंद्र सरकार २० कोटी युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी. चार लाख काश्मिरी पंडितांना हक्काचे घर देण्यात अपयशी ठरली असल्याची टीका तोगडिया यांनी केली. बांग्लादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यातही सरकार अपयशी ठरले. कापूस, चणा, डाळींच्या किंमती गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत ३० टक्क्यांहून कमी झाल्या आहेत. गरीब व्यक्तीचा मुलगा डॉक्टर बनू शकत नाही, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपा