शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑपरेशन बालासोर’मधून ‘त्यांनी’ वाचविले शेकडो प्राण; अडीच हजार कर्मचारी अन् शेकडो देवदूत

By नरेश डोंगरे | Updated: June 9, 2023 06:11 IST

महाराष्ट्राचे सुपुत्र जिल्हाधिकारी दत्तात्रेय शिंदे यांची कामगिरी

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एकीकडे मृतदेहांचा खच, त्यात पावलोपावली दबलेले वेदनांनी विव्हळणारे गंभीर जखमी, मृतांच्या नातेवाइकांच्या किंकाळ्या, आक्रोश अन् वेदनांचा तो क्षण कुणाच्याही काळजाचे पाणी करणारा होता. मीसुद्धा त्या क्षणी सुन्न झालो होतो. मात्र, कर्तव्य भावनेने दुसऱ्याच क्षणी भानावर आलो. ॲम्बुलन्स, बंब, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, पोलिसांच्या तत्परतेने सुरू झाले ‘ऑपरेशन बालासोर’. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविल्याची भावना व्यक्त केली महाराष्ट्राचे दत्तात्रेय भाऊसाहेब शिंदे यांनी !

महाराष्ट्राच्या पारनेर तालुक्यातील मूळ निवासी असलेले दत्तात्रेय ऊर्फ दत्ता शिंदे बालासोरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दि. २ जूनच्या रात्री बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला अन् त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडोजण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी पोहोचताच जिल्हाधिकारी शिंदे यांनी  जलदगतीने निर्णय घेतले, भरीव मदतकार्यही राबविले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने आज त्यांच्याशी संपर्क साधून ‘ऑपरेशन बालासोर’ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, घटनास्थळी खूप अंधार असल्याने ५० टॉवर लाइट्सची व्यवस्था करून जखमींना रुग्णालयात हलविणे सुरू केले. सुमारे एक हजार ते बाराशे व्यक्तींना आजूबाजूच्या शहरातील विविध इस्पितळात पाठविले.

अडीच हजार कर्मचारी अन् शेकडो देवदूत

‘लोकमत’शी बोलताना शिंदे यांनी देवदूतांची गोष्ट सांगितली. गेल्या सहा दिवसांपासून आम्ही सुमारे अडीच हजार अधिकारी-कर्मचारी काम करीत आहोत. मात्र, अपघात झाल्यापासूनच शेकडो देवदूत येथे अपघातग्रस्तांंच्या मदतीसाठी तहान-भूक विसरून मदतकार्य करीत आहेत. कोणतीही अपेक्षा न करता स्वयंस्फूर्तीने या देवदूतांनी मदत कार्यात दिलेले योगदान अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले.

आता ‘त्यांना’ सर्वोच्च प्राधान्य : जखमींवर तातडीचे उपचार ही आतापर्यंतचे प्राधान्य होते. आता मात्र अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रमाणपत्राशिवाय विम्याची रक्कम आणि अन्य सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी वेगवेगळे पथके नियुक्त केली आहेत, असे जिल्हाधिकारी दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात