शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

मृत्यूच्या दाढेतील विद्यार्थ्यांसह अनेकांचे जीव वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 10:30 IST

रस्ते पाण्यात गेलेले. अशात विद्यार्थ्यांनी भरलेली बस वाहनचालक पुढे काढतो. ती बस पुलाच्या अलीकडे काहीशा खोलगट भागात बंद पडते अन् पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कलंडते. बसमधील विद्यार्थ्यांची रडारड, किंचाळ्या वाढतात.

ठळक मुद्देपोलीस उपायुक्त भरणेंची प्रशंसनीय कामगिरी डिझास्टर मॅनेजमेंटच्या उत्तराखंड पॅटर्नचा उपराजधानीत वापर

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :

पोलीस उपायुक्त, हुडकेश्वरचे ठाणेदार अन् पोलिसांचा ताफा तसेच परिसरातील शेकडो नागरिक पुलाच्या पलीकडून हे काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य बघत असतात. पुलावर पाच फुटांपेक्षा जास्त पाणी असल्यामुळे कुणी जीव धोक्यात घालण्याची हिंमत दाखवत नाही. मात्र, आणखी काही क्षण गेल्यास काय आक्रित घडू शकते, याची कल्पना असल्यामुळे पोलीस उपायुक्तांनी आपल्या ताफ्यातील पोलिसांसोबतच नागरिकांनाही मदतीसाठी तयार करून घेतले. स्वत: पुलाच्या पाण्यात शिरून पलीकडे दोर घेऊन पोहचले. त्यांनी कलंडलेल्या बसमधून विद्यार्थ्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून दुसऱ्या बसमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी पोहचवले. काळजाची धडधड वाढवणाऱ्या तब्बल तासाभराच्या या थरारक घटनाक्रमात खुद्द पोलीस उपायुक्तांचाच जीव दोनदा धोक्यात आला होता. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत स्वत:सोबतच अनेकांचा जीव वाचवून खाकीची शान वाढवली.नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरलेल्या आज ६ जुलैचे रिअल हिरो ठरलेल्या या पोलीस अधिकाऱ्याचे नाव नीलेश भरणे असून ते परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त आहेत. मुसळधार पावसामुळे उपराजधानीत एकच गोंधळ निर्माण झाला असताना स्थानिक प्रशासन पांगळे झाल्यासारखे जाणवत होते. अनेकांच्या घरात, कार्यालयातच नव्हे तर शाळांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे राज्य सरकारच्या उपस्थितीत उपराजधानीतील विविध भागात हाहाकार उडाला होता. सर्वत्र धावपळ, आरडाओरड, मदतीसाठी याचना सुरू होती. तिकडे आपत्ती व्यवस्थापनाची पुरती ऐशीतैशी झाल्यासारखे भासत होते. अशात नैसर्गिक आपत्तीच्या, आणीबाणीच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन (डिझास्टर मॅनेजमेंट) कसे करायचे, याचा धडा पोलीस उपायुक्त भरणे यांनी घालून दिला. प्रश्न होता हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळकरी मुलांच्या जीविताचा.नागपूर शहराच्या दक्षिणेला असलेल्या पिपळा भागातील सुमारे एक किलोमिटरचा परिसर तलावासारखा झाला. रस्ते पाण्याखाली आले. त्यामुळे त्या भागातील शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले. सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना पिपळा ग्राम येथील आदर्श संस्कार विद्यालयाच्या प्रशासनाने शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची घिसाडघाई केली. विद्यार्थ्यांनी भरलेल्या दोन बस भयावह स्थितीत शाळेबाहेर काढल्या. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे पुलाच्या अलीकडे एक बस खोलगट भागात बंद पडली. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले.बस अडकून पडल्याने असहाय विद्यार्थी किंचाळू लागले. पुलाच्या पलीकडे मोठ्या संख्येत नागरिक होते. पोलीसही होते. परंतु पुलावर पाच फुटांपेक्षा जास्त वेगात पाणी वाहत असल्यामुळे कुणी जीव धोक्यात घालण्याची हिंमत दाखवत नव्हते. वेळ असाच दवडल्यास काय आक्रित घडू शकते, याची कल्पना आल्यामुळे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आपल्या ताफ्यातील पोलिसांसोबत नागरिकांनाही मदतीसाठी तयार करून घेतले.स्वत: पुलाच्या पाण्यात शिरून पलीकडे दोर घेऊन पोहचले. त्यांनी कलंडलेल्या बसमधून विद्यार्थ्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून दुसऱ्या बसमध्ये बसवले.

मृत्यूशी दोनदा सामनापाण्यातून बस बाहेर काढायची होती. मात्र, तिच्या चालकाची भीतीमुळे गाळण उडाली होती. त्यामुळे बस सुरूच होत नव्हती. अशात चालकाने बस चालविण्यास नकार देऊन खाली उडी घेतली. उपायुक्त भरणे यांनी त्यांच्या शासकीय कारचा चालक पोलीस कर्मचारी प्रफुल्ल आमले याला बस चालवण्यास सांगितले. बस वाहून जाऊ नये म्हणून चारही बाजून दोर बांधून शंभरावर नागरिकांची मानवी साखळी तयार करीत बसला पाण्यातून ओढण्यास सांगितले. ज्यांना पोहणे जमते अशांना धक्का मारायला सांगितले. धक्का मारताना चिखलात पाय घसरल्याने उपायुक्त भरणे पाण्यात पडले. मात्र, लगेच ते उठून उभे झाले. हा एक प्रसंग. तर, दुसरा प्रसंग त्याहीपेक्षा थरारक होता. बसला धक्का मारताना अचानक पाण्यातून वाहत आलेला लांबलचक साप त्यांच्या अंगावर आला. त्यांनी तो झटकून फेकला. असाच एक साप हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने यांच्याही अंगावर आला आणि तेसुद्धा बचावले. अशा प्रकारे मृत्यूशी सामना करीत त्यांनी बसला धक्का मारून सुरू करत बाहेर काढले अन् विद्यार्थ्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहचवले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर