शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सावरकर मुद्द्यावरुन चहापानावर विरोधकांचा बहिष्कार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:34 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील तापले आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देरविवारी बैठकीत निर्णय होणार : भाजपाचे बहुतांश आमदार न जाण्याच्या भूमिकेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील तापले आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेससह सहभागी असलेल्या शिवसेनेने या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्याने भाजपामधील नाराजी आणखी वाढली आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात रविवारी सकाळी ११ वाजता नागपुरात होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.परंपरेनुसार मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित करतात. साधारणत: विरोधकांकडून सरकार समस्यांप्रति गंभीर नसल्याचा आरोप करत यावर बहिष्कार टाकण्यात येतो. यंदा उद्धव ठाकरे यांचे हे मुख्यमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन राहणार आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे विरोधकांना चहापानासाठी निमंत्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसकडून सावरकर यांच्यासंदर्भात आलेले वक्तव्य व शिवसेनेने घेतलेली अतिशय मवाळ भूमिका यामुळे बहुतांश भाजप आमदार हे नाराज आहे. अगोदरच शिवसेनेने सत्तास्थापनेच्या वेळी तोडलेली युती व त्यात आता सावरकरांबाबतच्या वादामुळे चहापानाला जाऊ नये असे त्यांचे मत आहे. त्यामुळे रविवारच्या बैठकीकडे विरोधकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.अद्याप अंतिम निर्णय नाही : फडणवीसयासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला असता अद्यापपर्यंत चहापानाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारच्या बैठकीत आमदारांचे मत लक्षात घेऊन याबाबत आम्ही भूमिका ठरवू, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर