शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सावनेर, काटोल, हिंगणा कामठीत कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST

सावनेर/ कळमेश्वर/ कामठी/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही/ रामटेक/ कन्हान : नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत बुधवारी ९९७ रुग्णांची नोंद ...

सावनेर/ कळमेश्वर/ कामठी/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही/ रामटेक/ कन्हान : नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत बुधवारी ९९७ रुग्णांची नोंद झाली. यासोबतच सावनेर, काटोल आणि हिंगणा तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. सावनेर तालुक्यात बुधवारी २२५ रुग्णांची नोंद झाली तर रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १०६ तर ग्रामीणमध्ये ११९ रुग्णांची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात ६७१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १११ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील ५६, डिगडोह १५, नीलडोह १३, हिंगणा व टाकळघाट येथेळी प्रत्येकी ६, इसासनी ५, मोंढा, गुमगाव येथे प्रत्येकी ३, खापरी गांधी २ तसेच सुकळी घारापुरी, खैरीपन्नासे व कोतेवाडा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली.

काटोल तालुक्यात आणखी १०३ रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कलंभा येथे ७, कोंढाळी ६, येनवा ५, मूर्ती, लाडगाव, कोहळा, वाढोणा, पारडसिंगा, गोन्ही येथे प्रत्येकी ४, मुकणी ३, चारगाव, कुकडी पांजरा, इसापूर येथे प्रत्येकी २ रुग्ण तर कचारीसावंगा, पंचधार, डोरली (भिंगारे), हातला, घुबडी, मसली, शिरसावाडी, मेंडकी, चिचोली, वंडली, कारला, डोरली (भांडवलकर), पानवाडी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. पारशिवनी तालुक्यातील कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १४४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

कळमेश्वर तालुक्यात २२ रुग्णांची नोंद झाली. त्यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात गोंडखैरी ७, धापेवाडा ५, आदासा, निमजी येथे प्रत्येकी २ तर भंडागी, चौदामैल, तेलकामठी, तिंडगी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

उमरेड तालुक्यात बुधवारी ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात शहरातील २४ तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे.

नरखेड तालुक्यात ४१ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील ९ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७४ तर शहरातील ४२ इतकी आहे. कुही तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३९७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे ९, टेंभरी २, सिल्ली ५, बोरी २, मांढळ २, हरदोली नाईक १६, सोनपुरी ६ तर चापेगडी, अंबाडी, वेलतुर, तारणा, खैरलांजी, कऱ्हांडला व साळवा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

रामटेक तालुक्यात ३१ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील ८ तर ग्रामीण भागातील २३ रुग्णांचा समावेश आहे.

कामठी ग्रामीणमध्ये धोका अधिक

कामठी तालुक्यात बुधवारी ७५ रुग्णांची नोंद झाली. यात कामठी शहरातील २६ तर कामठी कंटेनमेंट परिसरातील ४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात महादुला १९, कोराडी ८, धारगाव येथे ७ तर नांदा, पांजरा येथे प्रत्येकी ४ तसेच खापा, लोणखैरी, पवणगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.