नागपूर : महाशिवरात्रीचे निमित्त साधून भास्कर वाघुळे एन्टरटेन्मेंटच्या वतीने ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी बॉलिवूडच्या प्रख्यात गायकांची गाणी सादर करण्यात आली. संजीवनी बुटी, श्रीकांत सप्रे, कृष्णा कपूर, अजय देशपांडे, अजय मुखर्जी, राजेंद्र उबाळे, पार्थ बिस्वास, नितीन झाडे यांनी विविध गाणी सादर केली. निवेदन कृष्णा महादुरे यांनी केले.
--------------
नीलू मुनाफने सादर केला अलग अंदाज
नागपूर : हार्मोनीच्या वतीने महिला दिनाच्या पर्वावर आयोजित कार्यक्रमात निवडक अशा तेरा गायिकांच्या आवाजातील गीते एकसाथ गाण्याचा अलग अंदाज गायिका नीलू मुनाफ यांनी सादर केला. यावेळी नीलू यांनी शमशाद बेगम, रुना, जसबिंदर, अलिशा चिनॉय, इला अरुण, रेखा भारद्वाज, सपना अवस्थी आदींची गाणी सादर केली. संकल्पना राजेश समर्थ यांची होती तर निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते.
-----------
स्वरतारकांनी जिंकली रसिकांची मने
नागपूर : जागतिक महिला दिनाच्या पर्वावर हिंदी चित्रपट गीतांवर आधारित स्वरतारकाने रसिकांची मने जिंकली. अर्जना अंबुलकर, पलक आर्य, स्वाती खडसे, मंजूषा दिवटे, अश्विनी साळुंके, विजया वैद्य, दीप्ती पुरोहित, ज्योती बनकर, विजया गोरे यांनी विविध गाणी सादर केली. संकल्पना राजेश समर्थ तर निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते.
....................