शहरं
Join us  
Trending Stories
1
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
2
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
3
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
4
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
6
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
7
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
8
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
9
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
10
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
11
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
12
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
13
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
14
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
15
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
16
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
17
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
18
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
19
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
20
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

सतीश उके यांना दोन महिने कारावासाची शिक्षा

By admin | Updated: March 1, 2017 02:12 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अ‍ॅड. सतीश उके यांना फौजदारी अवमानना प्रकरणात दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड

हायकोर्ट : ३ मार्चपर्यंत आत्मसमर्पण करण्याचा आदेश नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अ‍ॅड. सतीश उके यांना फौजदारी अवमानना प्रकरणात दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास अशी शिक्षा सुनावली. उके यांचे वय कमी असल्याने व त्यांच्याविरुद्ध प्रथमच फौजदारी अवमाननेचे आरोप सिद्ध झाल्यामुळे केवळ दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावत असल्याचे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांचे विशेष न्यायपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने उके यांना फौजदारी अवमाननेसाठी सोमवारीच दोषी ठरविले होते. परंतु, अजामीनपात्र वॉरन्ट बजावल्यानंतरही उके न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते. परिणामी न्यायालयाने त्यांना आणखी एक संधी देत आज, मंगळवारी शिक्षेवर सुनावणी निश्चित केली होती व उके यांना सकाळी १०.३० वाजता न्यायालयात उपस्थित राहून शिक्षेवर बाजू मांडण्यास सांगितले होते. असे असतानाही उके न्यायालयात हजर झाले नाही. परिणामी न्यायालयाने निर्णयाचा उर्वरित भाग पूर्ण करून उके यांना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. तसेच, उके यांना ३ मार्चपर्यंत पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने वकिलाला फौजदारी अवमाननेसाठी दोषी ठरवून शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे विधी क्षेत्रात बोलले जात आहे. विद्यमान न्यायमूर्ती, न्यायालयीन अधिकारी व सरकारी वकिलांवर वारंवार निरर्थक आरोप करण्याची उके यांची सवय लक्षात घेता न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध स्वत:च फौजदारी अवमानना याचिका दाखल केली होती. न्यायालयाने उके यांना शिक्षा सुनावल्यानंतर ही याचिका निकाली काढली. उके यांच्यातर्फे अ‍ॅड. बिजयकृष्ण अधिकारी तर, शासनातर्फे अतिरिक्त वकील केतकी जोशी यांनी बाजू मांडली. निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे सुनावणीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची मेमरी चिप सीलबंद करून न्यायिक प्रबंधक कार्यालयात जमा करण्याचा व ही चिप न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणालाही न देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उके हे स्वत: न्यायिक प्रबंधक कार्यालयात येतील तेव्हाच त्यांना या निर्णयाची प्रमाणित प्रत देण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. उके यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना याचिका दाखल करण्याचा आदेश देणाऱ्या एकल न्यायपीठाने ही याचिका प्रलंबित असेपर्यंत उके यांना विद्यमान न्यायमूर्ती, न्यायालयीन अधिकारी व सरकारी वकील यांच्याविरुद्ध कोणतेही प्रकरण दाखल करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. हा आदेश विशेष न्यायपीठाने पुढे लागू ठेवला आहे.