शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तामिळनाडूचे गाव अन् नागपूरचे विद्यार्थी! स्वप्नांना बळ मिळाले, तयार केलेले सॅटेलाइट अवकाशात झेपावले

By मंगेश व्यवहारे | Updated: February 20, 2023 19:54 IST

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइन लाँच मिशन-२०२३ अंतर्गत तामिळनाडूमध्ये झाला उपक्रम

नागपूर : मार्टिन फाउंडेशन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडियाच्या समन्वयाने संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइन लाँच मिशन-२०२३ तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील पट्टीपोलम गावातून लाँच करण्यात आले. एका रॉकेटच्या साहाय्याने १५० पिको सॅटेलाइट अवकाशात सोडण्यात आले. यात नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १० पिको सॅटेलाइटचा समावेश होता. विशेष म्हणजे, या लाँचिंगच्या वेळी महापालिकेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलामतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन -२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या मिशनअंतर्गत देशभरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले १५० सॅटेलाइट रॉकेटद्वारे अवकाशात सोडण्यापर्यंतच्या या प्रवासात दोन महिन्यांचा कालावधी लागला. या दीडशे सॅटेलाइटमध्ये नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे १० सॅटेलाइट होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. सॅटेलाइट बनविण्यासाठी नागपुरात कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत बनविण्यात आलेले सॅटेलाइट रविवारी लॉचिंगद्वारे अवकाशात सोडण्यात आले. वातावरणातील विविध घटकांचा अभ्यास या उपग्रहांच्या माध्यमातून करण्यात येईल. रविवारी झालेल्या कार्यक्रमात नागपूर महापालिकेच्या शाळांमधील ७ विद्यार्थी आणि ४ शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाला तामिळनाडूच्या राज्यपाल टी. सौंदराराजन उपस्थित असल्याची माहिती महापालिकेच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूर