शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

संतोष आंबेकरने डेव्हलपरकडून वसूल केले सावकारी व्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 10:57 IST

कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने चार वर्षांपूर्वी एका तरुण डेव्हलपरला जबरदस्ती आदिवासीची जमीन खरेदी करून प्लॉट टाकण्यासाठी दबाव टाकला होता. त्यासोबतच साडेसात लाख रुपयांची सावकारी व्याजाची वसुली केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला आहे.

ठळक मुद्देआंबेकर, अरमरकर आणि दलाल अरविंद पटेलची न्यायालयीन कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने चार वर्षांपूर्वी एका तरुण डेव्हलपरला जबरदस्ती आदिवासीची जमीन खरेदी करून प्लॉट टाकण्यासाठी दबाव टाकला होता. त्यासोबतच त्याला जमिनीच्या खरेदीसाठी ३२ लाख रुपये देऊन साडेसात लाख रुपयांची सावकारी व्याजाची वसुली केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला आहे.प्रशांत रमेश कांबळी (३२) रा. व्यंकटेशनगर असे फिर्यादीचे नाव आहे. मुख्य आरोपी संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारसह इतरांचा यात समावेश आहे. हे प्रकरण २०१५ मधील आहे. संतोषने फिर्यादी प्रशांत कांबळीला उमरेडच्या मौजा उटी येथे खाते क्रमांक १३१ येथील २.८६ हेक्टर आर आदिवासी परिवाराची जमीन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. ही जमीन आदिवासीची असल्यामुळे अहस्तांतरणीय आहे, हे माहीत असतानाही संतोषने स्वत:ची मंत्रालयात ओळख असून जमीन सोडविण्याचा दावा केला होता. त्याने ले-आऊटमध्ये आपला भाचा नीलेश केदारला ५० टक्के भागीदार बनविले होते.दुसरीकडे जमिनीचा सौदा केल्यानंतर आपली मुलगी संचिताच्या नावावर ले-आऊट टाकायला लावले. अशा प्रकारे या व्यावसायिकाला फसवून तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत वसुली केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी देणे तसेच महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ च्या कलम ४४, ४५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय १२ आॅक्टोबरला सीताबर्डी ठाण्यात आरोपी संतोष आंबेकर, नीलेश केदार, चंदन चौधरी, जुही चौधरी, अंकितकुमार पटेल, अजय पटेल, राजा अरमरकरला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत अटक केली आहे. यात नीलेश केदार, चंदन चौधरी, जुही चौधरी, अंकित पटेल आणि अजय पटेलला शुक्रवारी १ नोव्हेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाच आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.१४ दिवसाची न्यायालयीन कोठडीफसवणुकीच्या प्रकरणात मुख्य आरोपी संतोष आंबेकर, राजा अरमरकर, अरविंद द्वारकाभाई पटेल या तिघांच्या पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेऊन फरार आरोपींच्या अटकेनंतर पुन्हा पोलिसांना पोलीस कोठडी घ्यावयाची आहे. या उद्देशाने शुक्रवारी संतोष, राजा आणि अरविंद पटेलची न्यायालयीन कोठडी मागण्यात आली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने तिन्ही आरोपींची १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर आरोपी संतोष आंबेकरला लकडगंजमध्ये दाखल छेडखानी, बलात्कार आणि बाल लैंगिक गुन्हा संरक्षण कायद्यानुसार अटक करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. त्यानुसार आंबेकरची या प्रकरणातही पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी