शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरने केले आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 14:03 IST

नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. गेल्या दोन वर्षापासून तो फरार होता.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून होता फरार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. गेल्या दोन वर्षापासून तो फरार होता.दोन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड बाल्या गावंडे यांची हत्या झाली होती. बाल्याला जावई मानणारा त्याचा खास मित्र आणि साथीदारांनी त्याची अमानुष हत्या केली होती. दीड कोटी रुपयांच्या भूखंडाच्या वाटणीवरून वाद झाल्यानंतर बाल्या गावंडे याने संतोष आंबेकरच्या नावाने काही ठिकाणी शिवीगाळ केली होती. बाल्याची खूनशी वृत्ती ध्यानात घेता तो धोकादायक ठरू शकतो, हे संतोषच्या ध्यानात आले होते. त्यामुळे त्याने बाल्याच्या खास मित्रालाच फितवले आणि त्याच्याकडून बाल्याला एक ओली पार्टी देऊन त्याच रात्री त्याची हत्या करवून घेतली होती. कळमना पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर तपासात या हत्याकांडाचा मास्टर मार्इंड संतोष असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे पोलिसांनी संतोषवर गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच संतोष फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याला शोधत होते. इकडे बाल्या गावंडेच्या हत्याकांडातील अन्य आरोपींविरुद्ध पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान कोर्टातून त्यांची निर्दोष सुटका झाली. संतोष मात्र फरारच होता. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी संतोषची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ते लक्षात घेत संतोष आज अचानक न्यायालयात पोहचला. आपण आत्मसमर्पण करीत असल्याचे त्याने वकिलाच्या माध्यमातून न्यायालयाला सांगितले.दरम्यान, संतोषने आत्मसमर्पण केल्याची माहिती शहरात वायुवेगाने पसरली. त्यामुळे पोलीस, पत्रकार आणि गुन्हेगारी जगतातील अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. संतोषला कोर्टाने कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दुपारी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. शुक्रवारी कळमना पोलीस त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेणार असल्याचे सांगितले जाते.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा