शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृत सखी सभा! भाषेच्या जननीची महती सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 12:23 IST

नागपुरातील काही महिलांनी सोशल मिडियावर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. आज या ग्रुपची महत्ती सातासमुद्रापार पोहचली आहे. या माध्यमातून संस्कृत भाषेच्या संवर्धनाचे एक सकारात्मक पाऊल पुढे पडत आहे. या माध्यमातून भाषांच्या जननीचा आधुनिक संवाद घडत आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियाद्वारे ‘संस्कृत’चा आधुनिक संवादनागपुरातील महिलांचा पुढाकार

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्कृत ही अतिप्राचीन भाषा असली तरी सध्या संस्कृत जाणणाऱ्यांची मोजकीच संख्या आढळते. त्यामुळे संस्कृत भाषेच्या प्रेमाखातर आणि तिच्या प्रचार प्रसारासाठी नागपुरातील काही महिलांनी सोशल मिडियावर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. आज या ग्रुपची महत्ती सातासमुद्रापार पोहचली आहे. या माध्यमातून संस्कृत भाषेच्या संवर्धनाचे एक सकारात्मक पाऊल पुढे पडत आहे. या माध्यमातून भाषांच्या जननीचा आधुनिक संवाद घडत आहे.‘संस्कृत सखी सभा’ असे या ग्रुपचे नाव आहे. संस्कृतच्या निवृत्त शिक्षिका विजया जोशी यांनी २९ डिसेंबर २०१६ मध्ये या ग्रुपची स्थापना केली होती. सुरुवातीला या ग्रुपमध्ये विजया जोशी यांच्या विद्यार्थिनी जुळल्या. त्यानंतर संस्कृत भाषेची तज्ञमंडळी जुळली. आता या ग्रुपमध्ये ज्यांना संस्कृत भाषेची आवड आहे, अशा महिलाही जुळत आहे. या ग्रुपमध्ये १८ वर्षाच्या तरुणीपासून ८० वर्षाची आजी सुद्धा सदस्य आहे. हा ग्रुप आता निव्वळ नागपूर अथवा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही तर विदेशात राहूनही संस्कृतची आवड जोपासणाऱ्या महिलासुद्धा ग्रुपशी जुळल्या आहेत. १५० हून अधिक सदस्य असलेल्या या ग्रुपमधून संस्कृत भाषेत संवाद साधला जातो. संस्कृत भाषेचे ज्ञान एकमेकांपर्यंत पोहोचविण्यात येते. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये महिलांना जुळवून घेण्यापूर्वीच त्यांना अलर्ट केले जाते. कुणीही शुभ प्रभात, शुभ रात्री अथवा कुठल्याही सणांच्या, वाढदिवसांच्या शुभेच्छा संदेश टाकण्यास मज्जाव केला जातो. प्रश्नावलीच्या माध्यमातून संस्कृत भाषेचे आदानप्रदान करण्यात येते. संस्कृतची नवीन पुस्तके, त्यावरील लेख, संस्कृत भाषेसंदर्भातील कार्यक्रम आदी माहिती एकमेकांशी शेअर करण्यात येते. या ग्रुपमध्ये संस्कृत भाषेच्या तज्ञ डॉ. शारदा गाडगे, डॉ. वीणा गाणू या मार्गदर्शक म्हणून आहे. संस्कृतमधील कुठलाही शब्द, व्याकरण, बोलताना येणाऱ्या अडचणी, भाषेच्या संदर्भातील माहिती या मार्गदर्शकाकडून सोडविण्यात येतात. संस्कृतातील श्लोक, सुभाषित नियमित टाकण्यात येतात. नुकताच या ग्रुपच्या सदस्यांकडून संस्कृत भाषेत एका अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन केले होते. संस्कृत भाषा टिकविण्यासाठी सरकारने शालेय शिक्षणात संस्कृत एक विषय म्हणून मान्य केला आहे. पण भाषेच्या संवर्धनासाठी खूप प्रयत्न होताना दिसत नाही. पण दैनंदिन व्यवहारात संस्कृत कशी रुजेल यासाठी संस्कृत सखी सभा या ग्रुपचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

संस्कृत सर्व भाषांची जननी मानली जाते कारण अनेक भारतीय भाषांमधील शब्द संस्कृत भाषेत सापडतात. मात्र, संस्कृत जाणणाऱ्यांची आणि बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने संस्कृत काहीशी लोप पावत असल्याचे चित्र आहे. संस्कृत भाषा टिकावी. ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी. त्यासाठी संस्कृत भाषेची महती लोकांना सांगून तिचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्दिष्टाने आमचा संस्कृत सखी सभा हा ग्रुप कार्य करतोय.- विजया जोशी, ग्रुप अ‍ॅडमिनमला संस्कृत आवडायचे. संस्कृतचा अभ्यासही मी करीत आहे. पण बोलण्याचे धाडस होत नव्हते. या ग्रुपमुळे माझा संस्कृतचा शब्दसंग्रह वाढला आहे. आता संस्कृतमधून संवाद साधण्याचे धाडस मी करते आहे.- सोनाली अडावदकर, ग्रुप मेंबर

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप