शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ती ‘संजीवनी’ पुन्हा सुरू

By admin | Updated: October 28, 2014 00:26 IST

ज्या ब्रॅण्डेड औषधांसाठी पूर्वी हजारो रु पये खर्च व्हायचे, त्याच औषधांसाठी होणारा खर्च शे-पाचशेवर आला होता. तो मध्य भारतातील पहिल्या जनमंचच्या जेनेरिक औषेधांच्या दुकानांमुळे.

जनमंचच्या जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटननागपूर : ज्या ब्रॅण्डेड औषधांसाठी पूर्वी हजारो रु पये खर्च व्हायचे, त्याच औषधांसाठी होणारा खर्च शे-पाचशेवर आला होता. तो मध्य भारतातील पहिल्या जनमंचच्या जेनेरिक औषेधांच्या दुकानांमुळे. गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ही ‘संजीवनी’च ठरली. सर्वसामान्यांना जगण्याची पुन्हा एकदा उमेद मिळाली होती. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकानाला आग लागली. सात लाखांचे औषधांसह इतर साहित्य भस्मसात झाले. मात्र, या राखेतून जनमंचने पुन्हा उभे राहण्याची जिद्द दाखविली. न डगमगता, न खचता पुढे जाण्याची ऊर्मी दाखवत आठवडाभरात जेनेरिक औषधाचे दुकान उभे केले. आज सोमवारी सायंकाळी या दुकानाचे पुन्हा उद्घाटन झाले. तेही एका सामान्य वयोवृद्ध नेहमीच्या ग्राहकाकडून.धरमपेठ झेंडा चौकातील या जनमंच जेनेरिक दुकानाच्या उद्घाटनाच्यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. पिनाक दंदे होते. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, उद्घाटक म्हणून अनसूयाबाई जाधव तर मंचावर जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, महासचिव राजू जगताप उपस्थित होते. जनमंचचा हा लोकोपयोगी पुढाकार २०१३ मध्ये सुरू झाला. जेनेरिक औषधे स्वस्त असतातच, पण ती गुणवत्तेत आणि परिणामकारकतेत जराही कमी नसतात. यामुळे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. या सेवेतून खऱ्या अर्थाने गरिबांची-मध्यमवर्गांची सेवा घडू लागली. दुकानाला आग लागली तरी या सेवेत खंड पडला नाही, असा आवर्जून उल्लेख अ‍ॅड. किलोर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून केला. ते म्हणाले, दुकानात आलेल्या ग्राहकांकडून त्यांच्या औषधांची यादी घेऊन सायंकाळी ती औषधे उपलब्ध करून दिली जात होती. यामुळे ही सेवा अखंडित होती. जेनेरिक औषधाचे हे दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी लोकांनीच मदत केली. यामुळे आता हे दुकान खऱ्या अर्थाने लोकांचे झाले आहे, असे म्हणत मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. विष्णू मनोहर म्हणाले, हे दुकान गरीब गरजूंसाठी अक्षरश: संजीवनी बनून धावून आले. परंतु जेव्हा दुर्दैवी घटना घडली तेव्हा जनमंच ही संघटना तीळमात्रही खचली नाही. रात्रंदिवस मेहनत घेऊन हे दुकान पुन्हा उभे केले. औषधांची आरोग्य सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, असे म्हणत त्यांनी जनमंचच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. दंदे म्हणाले, अन्न-वस्त्र-निवाऱ्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा अकाली मृत्यू होतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जनमंचचे हे दुकान संजीवनी ठरले आहे. औषधांच्या बाबतीत इतकी विदारक परिस्थिती असताना सामान्यांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असाच अखंडित सुरू राहावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. आभारप्रदर्शन राजू जगताप यांनी केले.जेनेरिक दुकानाला पुन्हा उभे करण्यासाठी ज्यांचे सहकार्य मिळाले त्या सर्वांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. यात माजी नगरसेवक बाबा मैंद, बुलडाणा येथील विष्णुपंत धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कन्हेरे, औषध सप्लायर अशोक अग्रवाल, गुप्ता, रंगलानी, आहुजा, दिलीपभाई, श्रीधर आर्ट्सचे श्रीधर उगले, भारद्वाज, तामस्कर, दवे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)