शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न

By योगेश पांडे | Updated: September 22, 2025 20:29 IST

विदेशातील मान्यवरदेखील येणार : हिंदू संमेलन, गृहसंपर्क मोहीमेवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे २ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे उपस्थित राहतील. शताब्दी वर्षातील कार्यक्रमाला ‘ग्लोबल रिच’ देण्याचा संघाचा प्रयत्न आहे. त्यासाठीच विविध देशांतील मान्यवर तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बोलविण्यात आले आहे. शताब्दी वर्षात संघाकडून गावपातळीवर गृहसंपर्क मोहीम राबवत हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली.नागपुरात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. संघाच्या विजयादशमी उत्सवात अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रिका, घाना यासारख्या देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सोबतच लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता, डेक्कन उद्योग समुहाचे के. व्ही. कार्तिक आणि बजाज फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज उपस्थित राहतील, अशी माहिती आंबेकर यांनी दिली. मागील वर्षी विजयादशमी उत्सवाला सात हजार स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते. यावेळी एकाच मैदानावर ही संख्या तिप्पट असेल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विदर्भ प्रांत संघचालक दीपक तमशेट्टीवार आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हे देखील उपस्थित होते.

पंच परिवर्तनाबाबत समाजात जागृतीसंघाकडून पुढील कालावधीत पंच परिवर्तनाच्या बिंदूंवर जागृती करण्यात येईल. यात पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था, कुटुंब प्रबोधन व नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल.

नेपाळवर थेट भाष्य करणे टाळले

आंबेकर यांना नेपाळसंदर्भातदेखील विचारणा करण्यात आली.मात्र त्यांनी थेट भाष्य करणे टाळले. जगाला विविध षडयंत्रांपासून मुक्त करण्यासाठी हिंदू समाजाला मजबूत केला पाहिजे असे ते म्हणाले.

शताब्दी वर्षातील महत्वाचे कार्यक्रम

  • ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये सरसंघचालकांच्या संवाद सत्राचे आयोजन
  • २१ डिसेंबर रोजी कोलकाता येथे सरसंघचालकांच्या संवाद सत्राचे आयोजन
  • ७ व ८ फेब्रवारी रोजी मुंबईत सरसंघचालकांच्या संवाद सत्राचे आयोजन
  • मणिपूरमध्येदेखील विजयादशमी उत्सवाचे मोठे आयोजन

फेक नॅरेटिव्हला गृहसंपर्कातून दूर करणार

संघाबाबत समाजात गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न सुरू असतात. मात्र संघाविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांचे पितळ उघडे पडले आहे. आम्ही वर्षभर गृहसंपर्क करणार आहोत व त्या भेटींमधून संघाबाबतचे गैरसमज दूर करण्यात येतील. असे आंबेकर यांनी सांगितले.

समाजातून वसाहतवादी मानसिकता हटविण्यावर भर

यावेळी आंबेकर यांनी संघाच्या अजेंड्यावरदेखील भाष्य केले. आपल्या भारतातील अनेक तत्व अद्यापही वसाहतवादी मानसिकतेत जगतात. हीच मानसिकता हटवून स्व आधारित व्यवस्था आणण्यावर भर देण्याची गरज आहे असे ते म्हणाले. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. केवळ लोकांमध्ये आत्मभान जागृत करण्याची आवश्यकता आहे असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRamnath Kovindरामनाथ कोविंदMohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर