शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

संघ स्वयंसेवक, कार्यकर्ता ते राष्ट्रीय नेता; नितीन गडकरी यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 10:20 IST

देशाचे भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांचा प्रवास अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झाला होता.

ठळक मुद्देराजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्वकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री (वय : ६३) शिक्षण : एमकॉम, एलएलबी प्रभावी प्रशासक म्हणून प्रसिद्ध पत्नी कांचन, निखील-सारंग-केतकी ही मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उद्योजक, शेतकरी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांचा प्रवास अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झाला होता. विद्यार्थी जीवनात त्यांची राजकारणासोबत ओळख झाली. त्यानंतर अनेक चढ-उतार आले, मात्र ‘सेवा’ केंद्रस्थानी मानून ते कार्य करत राहिले.नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा गावात नितीन गडकरी यांचा २७ मे १९५७ रोजी जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. १९७९ साली ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत सचिव झाले. १९८१ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे ते नागपूर शहराध्यक्ष झाले. १९८५ पासून गडकरी यांचा राजकारणात खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली. मात्र त्यात यश आले नाही. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. सातत्याने १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. २००२ मध्ये तर त्यांच्या विरोधात अर्ज भरणाºया सर्वांनीच अर्ज मागे घेतला व ते अविरोध निवडून आले होते. राज्यात युतीचे शासन आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता. पैसा नसतानाही खासगीकरणातून कामे करण्याचा त्यांनी सपाटा लावला. नागपूर, मुंबईसह राज्यात त्यांनी शंभरहून अधिक उड्डाणपुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकांत भाजपाचा दारुण पराभव झाला व गडकरी यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली व ‘व्हिजन-२०२५’मुळे पक्षात नवा जोश संचारला. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेत आले व केंद्रात त्यांच्यावर भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.पक्षाचा प्रचार प्रसार१९८० साली जनता पक्ष फुटला व हिंदुत्वाची विचारधारा असलेल्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. या पक्षाची जनतेला ओळख करून देण्यासाठी झटणाऱ्यांमध्ये नितीन गडकरी यांचादेखील समावेश होता. प्रचारासाठी भिंती रंगविण्याचे कामदेखील त्यांनी केले. अगदी सतरंजी उचलण्यापासून ते पाणी देण्यापर्यंतची कामे करण्यातही त्यांनी कमीपणा मानला नाही. ‘मूठभर लोकांचा संकुचित आणि मर्यादित पक्ष’ ही पक्षाची प्रतिमा बदलविण्यासाठी सर्व जातीपंथातील लोक जवळ आणावे लागतील, हे गडकरी अगोदरपासूनच म्हणत होते. गडकरी यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात पुढाकार घेतला होता. भाजपमध्ये हळूहळू सर्वच जाती-धर्माच्या लोकांचा प्रवेश होऊ लागला व पक्षाची प्रतिमा बदलू लागली.

‘रोडकरी’, ‘पुलकरी’राज्यातील मंत्रिपदाच्या काळात धडाकेबाज कामगिरी करून गडकरींची देशात ओळख निर्माण झाली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेसाठी ३६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना गडकरी यांच्या धोरणामुळे हा मार्ग केवळ १६०० कोटींमध्ये झाला व शासनाचे २००० कोटी रुपये त्यांनी वाचवले होते. या मार्गाने इतिहास घडविला.जन्म १९५७१९७७ राजकारणात सक्रीयआणीबाणीनंतर पुरोगामी लोकशाही आघाडीचे विदर्भाचे समन्वयक म्हणून कार्य. त्यानंतर अभाविपचे विदर्भ सचिव व भाजपुमोचे शहराध्यक्ष१९९५ राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्री पदाची जबाबदारी२००९ भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०१२ पर्यंत. या कालावधीत भाजपाच्या संघटनमजबूतीवर दिला भर. सोबतच पक्षाला मार्गावर आणले.२१०४ लोकसभा निवडणुकीमध्ये गडकरी यांनी पहिल्यांदाच नागपुरात लोकसभा निवडणूक लढविली. ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीपदाची जबाबदारी. पाच वर्षांच्या कार्यकाळात देशातील राष्ट्रीय महामार्ग, जलमार्ग यांच्यात थक्क करून टाकणारे काम केले. शिवाय जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणूनदेखील प्रभावी काम.

देशाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी झोकून देऊन काम केले. अक्षरश: देशभरात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले. त्यामुळेच त्यांच्या कार्याचे विरोधकांनीदेखील संसदेत कौतुक केले. गंगा शुद्धीकरणाचा संकल्पदेखील घेऊन अव्याहतपणे काम करत आहे. राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी असतानादेखील नागपूर व विदर्भाच्या विकासाकडेदेखील तेवढ्याच पोटतिडकीने लक्ष देतात. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी