शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रेतीच्या टिप्परने चिरडले : गर्भवती पत्नीसह पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 21:20 IST

गर्भवती पत्नीला डॉक्टरकडे तपासणीला घेऊन जात असलेल्या पतीने त्याची मोटरसायकल सर्व्हिस रोडवरून महामार्गावर घेताच उड्डाणपुलावरून वेगात आलेल्या टिप्परच्या डाव्या भागाचा मोटरसायकलला धक्का लागला आणि मोटरसायकलसह पती, पती दोघेही टिप्परच्या समोरच्या चाकाखाली आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा घटनास्थळीच तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गुमथळा गावाजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (गुमथळा) : गर्भवती पत्नीला डॉक्टरकडे तपासणीला घेऊन जात असलेल्या पतीने त्याची मोटरसायकल सर्व्हिस रोडवरून महामार्गावर घेताच उड्डाणपुलावरून वेगात आलेल्या टिप्परच्या डाव्या भागाचा मोटरसायकलला धक्का लागला आणि मोटरसायकलसह पती, पती दोघेही टिप्परच्या समोरच्या चाकाखाली आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा घटनास्थळीच तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या पोटातील बाळदेखील बाहेर आले होते. हा भीषण अपघात मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - भंडारा महामार्गावरील गुमथळा (ता. कामठी) गावाजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.विजय झनकलाल यादव (२९) व नीलू विजय यादव (२६) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. विजय हा मूळचा झपारा, जिल्हा शिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, तो साडेचार वर्षांपासून गुमथळा शिवारातील हल्दीराम कंपनीमध्ये वाहनचालक म्हणून काम करायचा. त्यामुळे तो पत्नी व पाच वर्षीय माही (मुलगी) यांना सोबत घेऊन गुमथळा येथील गोपाल मोहोड यांच्याकडे किरायाने राहायचा.नीलू ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याने तो तिला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी एमएच-३१/सीएक्स-००३८ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूर येथील डॉक्टरकडे जात होता. तो उड्डाणपुलाखालून डाव्या सर्व्हिस रोडने निघाला आणि उड्डाणपूल संपताच त्याने मोटरसायकल महामार्गावर घेतली. त्याचवेळी उड्डाण पुलावरून खाली उतरत नागपूरच्या दिशेने जात असलेल्या रेतीच्या एमएच-४०/एके-४०८० क्रमांकाच्या टिप्परच्या डाव्या भागाचा धक्का मोटरसायकलला लागताच नीलू चाकाखाली आली.परिणामी, अंगावरून चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, पोटातील बाळदेखील बाहेर आले होते. पायावरून चाक गेल्याने विजय गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि विजयला उपचारार्थ नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून नीलूचा मृतदेहही उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा पुढील तपास ठाणेदार मधुकर गीते करीत आहेत.पाच वर्षीय ‘माही’ अनाथविजय व निलूला पाच वर्षाची माही (मुलगी) आहे. ही गुमथळा येथील लिटिल स्टार कॉन्व्हेंटमध्ये शिकत असल्याने नागपूरला निघण्यापूर्वी विजयने तिला कॉन्व्हेंटमध्ये सोडले होते. अपघातात आपल्या आई व वडिलांचा मृत्यू झाल्याची तिला माहितीदेखील नव्हती. अपघात होताच त्याच्या झपारा येथील कुटुंबीयांना कळविण्यात आले. नागपूर जिल्ह्यात विजयचे कुणीही नातेवाईक राहात नसल्याने कुटुंबीय येईपर्यंत माही घरमालक गोपाल मोहोड यांच्याकडेच होती. या अपघातामुळे ती अनाथ झाली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू