शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेती तस्करांना दणका : चार टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 20:52 IST

रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफिया सरकारला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा फटका देतात.

ठळक मुद्देलाखोंची रेती जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे.नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफिया सरकारला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा फटका देतात. रेती माफियांच्या दावणीला महसूल तसेच पोलीस विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी असल्यामुळे रेती माफियांचे चांगलेच फावते. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १५ जूनला एक बैठक घेतली. नागपूर जिल्हा आणि शहरात सुरू असलेल्या रेती तस्करीला आळा घालण्याचे निर्देश दिले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची लगेच दखल घेत शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रेती माफियांना तातडीने चाप बसविण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री भंडारावरून रामटेक मार्गे नागपूर येणारे रेतीने भरलेले चार ट्रक उप्पलवाडी पुलाजवळ अडविले. पोलिसांनी ट्रक चालक राजेश उरकुडा सिंगनजुडे, प्रवीण रमेश संतापे, कृष्­णा गंगाराम सोनवणे आणि महादेव गोपीचंद डोंगरवार यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी ही रेती भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून आणल्याचे सांगितले मात्र पोलिसांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांनी महसूल विभागाच्या तहसीलदाराला बोलवून हे चारही ट्रक त्यांच्या स्वाधीन केले.रॉयल्टीच नाहीलाखोंची रेती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणणाऱ्या या चारपैकी कोणत्याच ट्रक चालकाकडे आवश्यक असलेली रॉयल्टी नव्हती. त्यामुळे त्यांनी नागपूरपर्यंत ट्रक कसे काय आणले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पुढच्यावर कारवाई, मागचे गायबनागपूर शहरात चोरीची रेती घेऊन येणाऱ्या रेती माफियांचे मोठे नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये १०० वर दलाल काम करतात. रोज रात्री नागपुरात १०० पेक्षा जास्त ट्रक रेती घेऊन येतात. प्रत्येक ट्रकमध्ये किमान एक किलोमीटरचे अंतर असते. चार किंवा पाच ट्रक पुढे असतात. त्यांच्यापासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर दुसऱ्या ट्रकची रांग असते. या ट्रकच्या पुढे आणि मागे रेती माफियांच्या नेटवर्कमधील दलाल दुचाकीने चालतात. पोलिसांची नाकेबंदी असल्यास ते लगेच फोन करून ट्रक चालकांना माहिती देतात. पोलिसांनी ट्रक अडविले की मागचे सर्व ट्रकचालक सतर्क होतात. त्यामुळे पोलिसांना एका वेळी फार तर चार-पाच किंवा दहा ट्रक कारवाईसाठी मिळतात. योजनाबद्ध पद्धतीने दहा-पंधरा किलोमीटरच्या परिसरात पोलिसांनी सापळा लावून कारवाई केल्यास एकाच रात्रीतून किमान ५० ते १०० ट्रक पोलिसांच्या हाती लागू शकतात.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीArrestअटक