शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडे यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:56 IST

भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीला घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (पीरिपा) पदाधिकाऱ्यांनी एलआयसी चौकात नारे-निदर्शने केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या पत्रकानुसार ‘पीरिपा’चा मोर्चा बुधवारी निघणार होता, परंतु मोर्चा न काढता नारे-निदर्शने करीत आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देपीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी : एलआयसी चौकात नारे-निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीला घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (पीरिपा) पदाधिकाऱ्यांनी एलआयसी चौकात नारे-निदर्शने केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या पत्रकानुसार ‘पीरिपा’चा मोर्चा बुधवारी निघणार होता, परंतु मोर्चा न काढता नारे-निदर्शने करीत आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.‘पीरिपा’चे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष थॉमस कांबळे, नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे व शहर अध्यक्ष अरुण गजभिये यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी एलआयसी चौकात नारे-निदर्शने केली. त्यानंतर पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात संभाजी भिडे यांना अटक करा, या मुख्य मागणीसोबतच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, नागपूरच्या पटवर्धन मैदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचे त्वरित बांधकाम करा, जीवनावश्यक वस्तू पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करा आदी मागण्यांचा समावेश होता. आंदोलनात रंजनाताई कवाडे, कैलास बोंबले, बाळूमामा कोसमकर, भगवानदास भोजवाणी, विजय पाटील, भीमराव गोसावी, विनोद पाटील, मोरेश्वर बागडे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८agitationआंदोलन