शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विनापरवाना औषधांची विक्री : मेडिकलमधील डॉक्टरच्या क्लिनिकवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:08 IST

विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विभागाचे विभागप्रमुख आहेत.

ठळक मुद्देएफडीएने औषधे केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विभागाचे विभागप्रमुख आहेत.प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे डॉ. प्रशांत टिपले यांचे ‘ईशा मार्इंड केअर’ नावाचे क्लिनिक आहे. मेडिकलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहून रविवारी व सुटीच्या दिवशी ते क्लिनिक चालवितात. डॉ. टिपले विनापरवाना रुग्णांना औषधांची विक्री करीत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) होती. रविवारी एका रुग्णाची तपासणी करून त्याला क्लिनिकमधील औषधांची विक्री करीत असताना अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चमूने त्यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या मनोविकाराच्या सर्व औषधी सील केल्या. साधारण १२ हजारांच्या या औषधी असल्याचे सांगण्यात येते. सोबतच ११ बिलबुक जप्त करण्यात आले. पकडलेल्या सर्व औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ‘एफडीए’चे म्हणणे आहे. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त (औषधी) चंद्रपूरचे श्रीकांत फुले व नागपूरचे सहआयुक्त पी.एम.बल्लाळ यांनी केली.तपासणी मोहीम सुरूच राहणारविनापरवाना औषधांची विक्री करणे गुन्हा आहे. परंतु काही डॉक्टर व औषध विक्रेते विनापरवाना विक्री करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार तपासणी व कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम सुरूच राहणार आहे.डॉ. राकेश तिरपुडेअन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त (औषधी)

टॅग्स :raidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग