शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री : मनपाची प्रथमच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:17 IST

शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री सुरू केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली आहे. हनुमाननगर झोनमधील थकबाकीदाराच्या विक्री केलेल्या संपत्तीचे विक्री प्रमाणपत्र गुरुवारी दुय्यम सहनिबंधक यांच्या कार्यालयात खरेदीदाराला प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्दे१२० स्थावर मालमत्ता होणार नावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री सुरू केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली आहे. हनुमाननगर झोनमधील थकबाकीदाराच्या विक्री केलेल्या संपत्तीचे विक्री प्रमाणपत्र गुरुवारी दुय्यम सहनिबंधक यांच्या कार्यालयात खरेदीदाराला प्रदान करण्यात आले.मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया करण्यात आली. उपायुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते खरेदीदाराला विक्री प्रमाणपत्र देण्यात आले. सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, सहायक अधीक्षक विकास रायबोले, राजस्व निरीक्षक गौरीशंकर रहाटे, रामदास चरपे आदी उपस्थित होते.मागील अनेक वर्षांपासून शहरातील मालमत्ताधारकांकडील थकीत कर वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारची कारवाई केली. थकबाकीदारांना वॉरंटही बजावले, जप्तीची कारवाईही करण्यात आली होती. मात्र यानंतरही थकबाकीदारांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे संपत्तीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.थकबाकीदारांची मालमत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध करून जाहीर लिलाव करण्यात आला. लिलावातील महत्तम बोलीला संपत्तीची विक्री करण्यात आली. या प्रक्रियेला एक वर्षाहून अधिक कालावधी लागला.थकबाकीदारांच्या तीन मालमत्ताची जाहीर लिलावाद्वारे विक्री केली आहे. गुरुवारी हनुमान नगर झोनमधील एका खरेदीदाराला विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शुक्रवारी दोन खरेदीदारांना विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जाहीर लिलाव प्रक्रियेमध्ये खरेदीदार उपलब्ध न झालेल्या संपूर्ण शहरातील १२० स्थावर मालमत्ता महापालिकेच्या नावावर करण्यात येणार आहे. खरेदीदार उपलब्ध न झालेल्या या स्थावर मालमत्ता नाममात्र शुल्कावर लवकरच मनपा आयुक्तांच्या नावे करण्यात येणार आहे.महापालिकेतर्फे ही कारवाई नियमित सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकबाकीदारांना यामार्फत शेवटची संधी दिली जाणार आहे. थकीत कराचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर