शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:29 IST

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांना समाजसेवकांच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांमध्ये रेशन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. काही व्यापारी त्याचा फायदा घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देमनपाची कारवाई निष्प्रभ : व्यापारी बिनधास्त करताहेत व्यवसाय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांना समाजसेवकांच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांमध्ये रेशन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. काही व्यापारी त्याचा फायदा घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहेत. एका व्यापाऱ्याने तर महानगरपालिके कडून दोन दिवस दुकान सुरू ठेवण्याची रीतसर परवानगी घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विकल्या. त्याची माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या एनडीएस सेलने व्यापाºयाला रंगेहात पकडले. त्यानंतरही इतवारीमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री सुरू आहे.लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गरजवंतांना प्लास्टिक पिशव्यांमधून जीवनावश्यक वस्तू वितरित करीत आहेत. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांची मागणी वाढली. व्यापारी या सामाजिक भावनेचा फायदा घेऊन सरकारने प्रतिबंधित केलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहेत. गरजवंतांना मिळत असलेली मदत लक्षात घेता पोलीस व मनपाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संधीचा लाभ घेण्यासाठी दुप्पट किमतीमध्ये प्लास्टिक पिशव्या विकल्या. गेल्या दीड महिन्यापासून हा अवैध प्रकार सुरू होता. ही बाब प्लास्टिक पिशव्यांचा व्यापारी पारस जैनवरील कारवाईने प्रकाशात आली. जैनने त्याच्या संबंधांचा उपयोग करून मनपाकडून दोन दिवस दुकान सुरू ठेवण्याची परवानगी घेतली होती. त्याचे दुकान सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक अचंबित झाले. त्यांनी मनपाकडे तक्रार केली. नागरिकांकडून जैनची पार्श्वभूमी माहिती झाल्यानंतर मनपा अधिकारी सतर्क झाले. दरम्यान, जैन दोन दिवस संपल्यावरही लपून प्लास्टिक पिशव्या विकत असल्याची माहिती अधिकाºयांना मिळाली. त्यानंतर त्यांनी जैनच्या घरून प्लास्टिक पिशव्या घेऊन जात असलेल्या ग्राहकाला पकडले. तसेच, जैनच्या घराची झडती घेऊन २०० किलो खर्रा पन्नी जप्त केल्या. परिणामी, जैन व इतर व्यापाºयांनी दोन-चार दिवसाकरिता प्लास्टिक पिशव्या विकणे बंद केले. परंतु, आता पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. प्लास्टिक पिशव्यांसाठी मनमानी किंमत घेतली जात आहे. मनपा अधिकारी व पोलीस कोरोना संक्रमण रोखण्यात व्यस्त असल्याचा व्यापारी फायदा घेत आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीnagpurनागपूर