शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

नागपुरात नकली विदेशी सिगारेटची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:05 IST

विदेशी ब्राण्डच्या प्रतिबंधित नकली सिगारेट शहरात सर्रासपणे विकल्या जात आहेत. विमानतळावर २६ लाख रुपयाची बोगस सिगारेट जप्त केल्यानंतरही हा धंदा सुरू आहे, हे विशेष.

ठळक मुद्देकोट्यवधीचा महसूल बुडतोयविमानतळावरील कारवाईचा परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी ब्राण्डच्या प्रतिबंधित नकली सिगारेट शहरात सर्रासपणे विकल्या जात आहेत. विमानतळावर २६ लाख रुपयाची बोगस सिगारेट जप्त केल्यानंतरही हा धंदा सुरू आहे, हे विशेष.शहरात अनेक वर्षांपासून विदेशी ब्राण्डच्या नकली सिगारेटची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. कस्टम आणि इतर शासकीय विभाग अनेक दिवसांपासून या टोळीविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहे. परंतु त्यांना यश मिळत नव्हते. वर्षभरापूर्वी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्राण्डची दोन लाख रुपये किमतीची नकली सिगारेट जप्त करण्यात आली होती. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सिगारेट जप्त केल्यानंतर ती परिसरातच सुरक्षित ठेवली होती. नंतर या जप्त केलेल्या सिगारेटमधून मोठ्या प्रमाणावर सिगारेट चोरी झाल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणात सोनेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर काही दिवसासाठी नकली सिगारेट विक्री करणारे शांत बसले होते. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच अलीकडे नकली सिगारेटची सर्रास विक्री होत आहे.भारतीय सिगारेटच्या तुलनेत विदेशातून येणाऱ्या नकली सिगारेट अर्ध्या किमतीचा मिळतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचा नफा दुप्पट होतो. ते पानटपरी चालवणारे, हॉटेल आणि बार संचालकांशी संगनमत करून बोगस सिगारेटची विक्री करतात. व्यापारी आणि सिगारेट विकणारे नफा कमावण्यासाठी नकली सिगारेटलाच प्राधान्य देतात. दुसरीकडे विदेशी सिगारेटच्या विक्रीवर भारतात प्रतिबंध आहे. विदेशी सिगारेट टर्की, इंडोनेशिया आणि दुबईमधून समुद्रमार्गाने भारतात दाखल होतात. त्याला मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई येथील बंदरावर उतरवले जाते. तेथून ते देशभरातील शहरात पोहोचविले जाते.विदेशी सिगारेटच्या विक्रीतून सरकारला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकार विदेशी सिगारेटच्या विक्रीबाबत अतिशय कडक आहे. अशा सिगारेटची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अशा लोकाविरुद्ध कस्टम, अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) आणि पोलीस कारवाई करू शकतात. परंतु आतापर्यंत केवळ पोलिसांनीच एखाददुसऱ्या प्रकरणात कारवाई केली आहे. इतर विभागांना कुठलेही मोठे यश मिळालेले नाही. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नकली सिगारेटची विक्री होत आहे. शहरातील काही व्यापारीही यात सहभागी आहेत. शासकीय विभाग आणि शहरातील व्यापारात त्यांची चलती असल्याचे सांगितले जाते.कठोर कारवाई केली जाईलविदेशी सिगारेटची विक्री भारतात प्रतिबंधित आहे. याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एफडीए आणि पोलीस सक्षम आहे. माहितीच्या अभावामुळे या व्यवसायात असलेली मंडळी पकडली जात नाही. माहिती मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कावाई केली जाईल. नागरिकांनीही यासंबंधात कुठलीही माहिती असल्यास त्यांनी विभागाला सूचना द्यावी.शशिकांत केकरेसहायक आयुक्त, एफडीए

 

टॅग्स :Cigaretteसिगारेटnagpurनागपूर