शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अपत्यसुखाच्या लालसेने बनविले आरोपी; चिमुकलीचे विक्री प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 21:15 IST

कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकलीला विकत घेणे एका सुशिक्षित दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्यसुखासाठी आसुसलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.

ठळक मुद्देचिमुकलीला विकत घेणाऱ्या दाम्पत्याविरुद्धही गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतनागपूर : कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकलीला विकत घेणे एका सुशिक्षित दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्यसुखासाठी आसुसलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.अमरावती मार्गावर राहणारा आणि मोलमजुरी करणारा अविनाश बारसागडे याची पत्नी मोना हिने २२ डिसेंबरला मेडिकलमध्ये एका चिमुकलीला जन्म दिला. तिच्या जन्माला येणाऱ्या अपत्यावर आठ महिन्यांपासून नजर ठेवून असलेली भारती नामक महिला दलाल तसेच हर्षा आणि मनीष मुंधडा या दाम्पत्याने दुसऱ्याच दिवशी मोनाच्या कुशीतून तिच्या नवजात चिमुकलीला ताब्यात घेतले आणि तिच्या हातात थोडीशी रक्कम कोंबून तिला गप्प केले. दुसरीकडे १८ वर्षांपासून अपत्यसुखासाठी आसुसलेले सोनेगावचे एक सुशिक्षित दाम्पत्य आरोपी मुंधडा दाम्पत्याच्या संपर्कात होते. सरोगसी सेंटर चालविण्याचा बनाव करणाऱ्या मुंधडा दाम्पत्याने सोनेगावच्या या अभियंत्याला त्याच्या पत्नीसह आधीच बाळ देण्याचा सौदा पक्का केला होता. या दाम्पत्याच्या भावनिक विवशतेचा गैरफायदा घेत त्यांना मोना आणि अविनाश बारसागडेची चिमुकली दिली. त्याबदल्यात त्यांच्याकडून सव्वादोन लाख रुपये घेतले. अनेक वर्षांनंतर अपत्यसुख मिळाल्याने अभियंता आणि त्याच्या पत्नीने चिमुकलीला घरी नेले. अवघ्या १२ दिवसातच ही चिमुकली त्यांच्या काळजाचा तुकडा बनली. तिच्यासह भविष्याच्या वेगवेगळ्या कल्पना रंगविणाऱ्या या दाम्पत्याला गुरुवारी ७ नोव्हेंबरला जबर मानसिक धक्का बसला. मुंधडा दाम्पत्याने सरोगसीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करून त्यांना ही चिमुकली विकल्याचे स्पष्ट झाले. धंतोली पोलिसांनी याप्रकरणी मुंधडा दाम्पत्याला अटक केल्याचेही वृत्तपत्रातून त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवून चिमुकलीला धंतोली पोलिसांच्या माध्यमातून मोनाला सोपविले. दरम्यान, चिमुकलीच्या खरेदी-विक्री प्रकरणात तांत्रिकदृष्ट्या अभियंता आणि त्याची पत्नी हे देखील आरोपी बनत असल्याने पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर या दाम्पत्यापैकी अभियंत्याला अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हा