लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म याच पावन दिवशी झाला. रामजन्माचा हा आनंद साजरा करताना अवघी नागपूरनगरी शनिवारी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. श्रद्धेच्या या सत्संगाचे प्रमुख केंद्र होते श्री पोद्दारेश्वर राम मंदिर. देखण्या स्वागत कमानी...फुलांचा स्वर्गीय दरवळ...प्रसादाचा घमघमाट...भगवे फेटे घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध संचलन...मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष...नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी आंतरऊर्जा यांचा दैवी संगम... अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात श्रीराम नवमी शोभायात्रेत रविवारी हजारो भाविकांनी रामनामाचा गजर केला. श्रीराम जय राम जय जय राम, प्रभू श्री रामचंद्र की जय, राम जन्मला गं सखे राम जन्मला अशा रामनामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूरही दुमदुमले.
सकल जिवांच्या ठायी राम...चराचरातील जागर राम : ५३ वर्षांची नेत्रदीपक परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:41 IST
चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म याच पावन दिवशी झाला. रामजन्माचा हा आनंद साजरा करताना अवघी नागपूरनगरी शनिवारी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. श्रद्धेच्या या सत्संगाचे प्रमुख केंद्र होते श्री पोद्दारेश्वर राम मंदिर. देखण्या स्वागत कमानी...फुलांचा स्वर्गीय दरवळ...प्रसादाचा घमघमाट...भगवे फेटे घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध संचलन...मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष...नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी आंतरऊर्जा यांचा दैवी संगम... अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात श्रीराम नवमी शोभायात्रेत रविवारी हजारो भाविकांनी रामनामाचा गजर केला. श्रीराम जय राम जय जय राम, प्रभू श्री रामचंद्र की जय, राम जन्मला गं सखे राम जन्मला अशा रामनामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूरही दुमदुमले.
सकल जिवांच्या ठायी राम...चराचरातील जागर राम : ५३ वर्षांची नेत्रदीपक परंपरा
ठळक मुद्देश्री पोद्दारेश्वर मंदिरातून भव्यदिव्य शोभायात्रा, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची उपस्थिती