शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे पत्नी भांडखोर आहे ! तीन अपत्यानंतर पतीची घटस्फोटासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 20:27 IST

वाचून आश्चर्य वाटू शकते, पण हे खरे आहे. एक पती तीन अपत्ये जन्माला घातल्यानंतर पत्नीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वाद पोहोचल्यामुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला.

ठळक मुद्देहायकोर्टात सिद्ध झाले नाही आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाचून आश्चर्य वाटू शकते, पण हे खरे आहे. एक पती तीन अपत्ये जन्माला घातल्यानंतर पत्नीपासून घटस्फोटमिळविण्यासाठी धडपड करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वाद पोहोचल्यामुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला.नागपुरातील दाम्पत्य निकिता व हर्षल (काल्पनिक नावे) यांचे ७ जून १९९७ रोजी लग्न झाले. त्यानंतर त्यांनी दोन मुली व एक मुलगा अशा तीन अपत्यांना जन्म दिला. अशा परिस्थितीत दोघांपैकी कुणीही घटस्फोटाचा विचार करू शकेल असे सहजासहजी कुणालाच वाटणार नाही. परंतु, हर्षलने हे पाऊल उचलले. त्याने निकितावर क्रूरतेचा आरोप करून त्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी १९ नोव्हेंबर २००५ रोजी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २३ एप्रिल २०१० रोजी कुटुंब न्यायालयाने त्याला घटस्फोट नाकारून केवळ न्यायिक विभक्ततेचा आदेश जारी केला. त्या आदेशाविरुद्ध निकिताने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयात निकिता क्रूर असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. परिणामी, न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी निकिताची याचिका मंजूर करून कुटुंब न्यायालयाचा आदेश रद्द केला तसेच हर्षलचे सर्व आक्षेपही फेटाळून लावले.निकिता तापट व संशयी स्वभावाची आहे. ती सकाळीच घरून बाहेर निघून जाते. घरची कोणतीही कामे करीत नाही. मुलांची काळजी घेत नाही. शारीरिक सहवास करू देत नाही. सतत भांडत राहते, असे आरोप हर्षलने केले होते. निकिताने लेखी उत्तर दाखल करून हे सर्व आरोप अमान्य केले. उच्च शिक्षित असल्यामुळे आपल्याला जबाबदाऱ्यांची जाणीव आहे. मार्च-२००४ पर्यंत हर्षल चांगला वागत होता. त्यानंतर त्याचा स्वभाव अचानक बदलला. विवाहबाह्य संबंधामुळे तो घटस्फोटाची मागणी करायला लागला. त्याचे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष झाले, असे स्पष्टीकरण निकिताने दिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDivorceघटस्फोट